Share

राज ठाकरेंना कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीत येऊ देणार नाही : संजय निरुपम

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीतून राज ठाकरे यांनी माघार घेतली होती परंतु भाजपच्या विरोधात त्यांनी प्रचार केला होता. भाजपाध्यक्ष अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात त्यांनी सभा घेतल्या होत्या. त्यामुळे कॉंग्रेसला आणि राष्ट्रवादीला फायदा झाला असल्याच चित्र आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडी करतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अशातच ‘राज ठाकरे यांना कुठल्याही परिस्थिती काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत घेणार नाही, येऊ देणार नाही’, अशी ठाम भूमिका मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांनी जाहीर केली आहे. पुढे बोलताना त्यांनी ‘मनसेचा आघाडीला फायदा होताना दिसला नाही. मनसेसाठी राष्ट्रवादी आग्रही असली, तरी काँग्रेसचा त्याला सक्त विरोध राहील. मनसेची भूमिका आणि काँग्रेसची भूमिका पूर्णपणे विरोधी असून, मनसेच्या भूमिकेचं कुठल्याही परिस्थितीत समर्थन करता येणार नाही’ असं विधान केल आहे.

दरम्यान, राज ठाकरेंना जर कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीत घेतलं नाही तर राज ठाकरे नेमकी काय भूमिका घेणार हे पाहनं महत्वाचं ठरणार आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!