Share

राज ठाकरेंना काळे फासणार! करणी सेनेचा इशारा

Published On: 

मुंबई:  ‘पद्मावत’ चित्रपटाला मनसे संरक्षण देणार आहे. त्यामुळे करणी सेनेचे अध्यक्ष अजय सिंह सेंगर यांनी राज ठाकरेंना काळे फासणार, असा इशारा दिला. मनसे ने ‘पद्मावत’ला संरक्षण दिल्यामुळे करणी सेना आणि मनसे आमनेसामने भिडण्याची शक्यता आहे.‘पद्मावत’चित्रपटाला मनसेकडून संरक्षण देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

दरम्यान, राज ठाकरेंना काळे फासणार असा इशारा करणी सेनेचे अध्यक्ष अजय सिंह सेंगर यांनी दिला आहे. देशभरातील विविध शहरांमध्ये करणी सेनेचे कार्यकर्ते आंदोलन करत आहेत. आता हा वाद अधिकच चिघळण्याची शक्यता आहे. प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून करणी सेनेच्या ५० कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. मनसेच्या सरचिटणीस व महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेच्या कार्याध्यक्षा शालिनी ठाकरे यांनी काल या वादावर मत व्यक्त केले होते. मनेसेने ‘पद्मावत’ला संरक्षणही देऊ केले आहे. यापूर्वी आम्हीही अनेक चित्रपटांना विरोध केला. मात्र, हा विरोध मुद्द्यांवर होता. चित्रपटाच्या आशयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आम्ही एकाही चित्रपटाला विरोध केला नाही, असे ठणकावून सांगतानाच ‘पद्मावत’ला होत असलेल्या विरोधाला मनसेने ठाम विरोध केला आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!