Share

Raj Thackeray : “वाटलं होतं तुम्ही मुख्यमंत्री व्हाल…” ; राज ठाकरेंचे फडणवीसांना पत्र

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : काल अखेर राज्याला आपला नवा मुख्यमंत्री मिळाला. काल रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी सोहळा पार पडला. मात्र ज्यावेळी देवेंद्र फडणवीसांनीं मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे यांचं नाव जाहीर केलं त्यावेळी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळात न राहण्याचा निर्णय घेतला होता. ते बाहेरून सरकारवर लक्ष ठेवणार होते.

मात्र त्यांना दिल्लीतून पक्षश्रेष्ठींचा आदेश आला आणि यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारला. तसेच शपथविधी सोहळ्यानंतर सर्वच स्तरातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक होत आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देत आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक पत्र ट्विट केलं आहे.

पत्रात नेमकं काय?

श्री. देवेंद्र फडणवीस उप-मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

यांसी सस्नेह जय महाराष्ट्र!

प्रिय देवेंद्रजी,

सर्वप्रथम महाराष्ट्राचे उप-मुख्यमंत्री म्हणून आपण जबाबदारी स्विकारल्याबद्दल आपले मन:पूर्वक अभिनंदन. वाटलं होतं की तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणूनच पुन्हा परताल, परंतु ते व्हायचं नव्हतं. असो…

तुम्ही ह्यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून सलग पाच वर्ष काम केलेत. आत्ताचं सरकार आणण्यासाठीही अपार कष्ट तुम्ही उपसलेत आणि इतकं असूनही आपल्या मनातील हुंदका बाजूला सारून, पक्षादेश शिरसावंद्य मानून उप-मुख्यमंत्रीपदाची सूत्रं हातात घेतलीत. पक्ष, पक्षाचा आदेश हा कुठल्याही व्यक्तीच्या आकांक्षेपेक्षा मोठा आहे हे तुम्ही तुमच्या कृतीतून दाखवून दिलं. पक्षाशी बांधीलकी म्हणजे काय असतं त्याचा हा वस्तुपाठच आहे. ही गोष्ट देशातल्या आणि राज्यातल्या सर्व राजकीय पक्षातील आणि संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी कायमस्वरुपी लक्षात ठेवण्यासारखी आहे. खरोखरच अभिनंदन!

आता जरा आपल्यासाठी ही बढती आहे की अवनती ह्यात मी जात नाही आणि कुणी जाऊही नये. पण एक सांगतो की, धनुष्यातून ध्येयाचा वेध घ्यायचा तर दोरी मागे ओढावी लागते. ह्या मागे ओढलेल्या दोरीला कुणी माघार म्हणत नाही! तुम्हाला ह्या पुढेही बराच राजकीय प्रवास करायचा आहे.

एक निश्चित की तुम्ही तुमचं कर्तृत्व महाराष्ट्रापुढे सिध्द केलेलंच आहे त्यामुळे देशाच्या भल्यासाठीही तुम्हाला अधिक काम करण्याची संधी मिळो हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना.

पुन्हा एकदा तुमचं मनःपूर्वक अभिनंदन!

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!