Share

राष्ट्रवादीने साथ सोडल्यानंतर आता काय ? मनसेची ‘कृष्णकुंज’वर महत्वाची बैठक

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादी कॉंग्रेसने मनसेची साथ सोडल्यानंतर आता काय ? यावर विचारविनिमय करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘कृष्णकुंज’वर महत्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीला मनसे नेते आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

राज ठाकरे काही प्रश्नावर आमच्या सोबत असले तरी निवडणुकीत एकत्र नसतील, असं सांगत मनसे-राष्ट्रवादी यांची आघाडी होण्याच्या चर्चांवर खुद्द शरद पवारांनी पडदा टाकला होता.

येत्या लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महागठबंधनमध्ये मनसेला स्थान नसल्याचं शरद पवारांनी जाहीर केलं होतं. त्यामुळे राष्ट्रवादीशी साधलेली जवळीक फुकट गेली की काय, असा मनसेसमोर प्रश्न आहे.

महागठबंधनमध्ये स्थान मिळालं नाही तर करायचं काय यावर मनसेची खलबतं सुरु आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीत मनसे मुंबई आणि ठाण्यासह तीन जागा लढवण्याच्या तयारीत आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!