🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा: भारत हा एक कृषीप्रधान देश आहे. भारतातील कृषी क्षेत्र (Agriculture Sector) दिवसेंदिवस मजबूत होत चालले आहे. शेतीत चांगली पीक घेण्यासाठी शेतकरी दिवस रात्र मेहनत घेत असतात. तर, दुसरीकडे सरकारही यामध्ये हातभार लावण्यासाठी शेतकऱ्यांसाठी अनेक योजना (Government Scheme) राबवत असते. दुष्काळ, अवकाळी पाऊस इत्यादी कारणांमुळे देशातील शेतकरी अनेकदा संकटात सापडतो. अशा परिस्थितीत शेतकरी केंद्र आणि राज्य सरकारकडे आर्थिक मदतीचे आवाहन करतो. त्यामुळे शेतकऱ्यांना संकट काळामध्ये मदत म्हणून सरकार शेतकऱ्यांसाठी विविध योजनाअंतर्गत मदत करत असते. त्यामधील काही योजनांबद्दल आम्ही आज या बातमीच्या माध्यमातून तुम्हाला माहिती सांगणार आहोत.
पीएम मानधन योजना
पीएम किसान योजनेअंतर्गत नोंदणी असलेल्या शेतकऱ्यांना पीएम मानधन योजनेचा लाभ दिला जातो. यासाठी शेतकऱ्यांना प्रीमियम भरावा लागतो. या योजनेमध्ये शेतकरी जेवढा हप्ता भरतात तेवढेच सरकारही भरते. या योजनेअंतर्गत तुम्ही जर शंभर रुपये जमा करत असाल तर सरकार तुम्हाला शंभर रुपये देईल. या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना साठ वर्षानंतर मिळेल. त्याचबरोबर या योजनेमध्ये शेतकऱ्यांना दरमहा तीन हजार रुपये पेन्शन म्हणून दिले जाणार आहे.
किसान क्रेडिट कार्ड योजना
शेतकऱ्यांना शेतीमध्ये पेरणी पासून ते विक्री पर्यंत भरपूर खर्च करावा लागतो. दरम्यान, शेतकऱ्यांना अनेक आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे पैसे संबंधित समस्यावर उपाय म्हणून सरकारने किसान क्रेडिट कार्ड योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना माफक व्याजदरात कर्ज सुविधा उपलब्ध करून दिली जाते. त्याचबरोबर किसान क्रेडिट कार्डवर शेतकऱ्यांना अल्पमुदतीचे कार्ड दिले जाते. यासोबतच कर्जाची वेळेवर परतफेड करण्यासाठी अनुदानही दिले जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना जवळचे वित्तीय संस्थेची किंवा बँकेची संपर्क साधावा लागतो. किसान क्रेडिट कार्ड योजनेबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही pmkisan.gov.in या वेबसाईटला भेट देऊ शकतात.
प्रधानमंत्री पिक विमा योजना
कधी दुष्काळामुळे तर कधी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची पिकं वाया जातात. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून सरकारने प्रधानमंत्री पीक योजना सुरू केली आहे. पूर्वी या योजनेमध्ये 15,100 रुपये प्रति हेक्टर रक्कम दिली जायची. पण आता या योजनेअंतर्गत सरासरी विम्याची रक्कम 40,700 करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
- High Blood Pressure | उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी करा ‘या’ टीप्स फॉलो
- IND vs NZ | दुसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये संजू सॅमसनला का नाही मिळाले स्थान?, कर्णधार शिखर धवनने सांगितले कारण
- Job Alert | अग्निपथ योजनेअंतर्गत भारतीय नौदलात ‘या’ पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू
- BJP | “उद्धव ठाकरे यांचे वक्तव्य म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे”, या भाजप खासदाराचा टोला
- Sachin Ahir | “कोणाचं मानसिक आणि राजकीय संतुलन बिघडलं…”, सचिन अहिर यांचं एकनाथ शिंदेंना प्रत्युत्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
