🕒 1 min read
मुंबई: बॉलीवूड अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fateh) नेहमी तिच्या डान्स आणि फॅशन स्टेटमुळे चर्चेत असते. सध्या नोरा फतेही ‘झलक दिखला जा’ (Jhalak Dikhala Ja 10) या सेलिब्रिटी डान्स रियालिटी शोमध्ये जजची भूमिका साकारत आहे. या शोच्या माध्यमातून नोराच्या चाहत्यांसमोर तिच्या अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. नुकत्याच एका एपिसोडमध्ये तिने तिच्या प्रेमभंगाबद्दल (Breakup) सांगितले आहे.
झलक दिखला जा च्या ग्रॅण्ड फिनालेमध्ये रुबीना दिलीक, गश्मीर महाजनी, निशान भट, गुंजन सिन्हा, फैजल शेख आणि श्रिती झा यांनी शेवटचा परफॉर्मन्स सादर केला. दरम्यान, श्रिती झाने तिच्या कोरिओग्राफर पार्टनरसोबत नोरा फतेही आणि विकी कौशल यांच्या ‘बडा पचताओगे’ गाण्यावर डान्स केला होता. हा डान्स परफॉर्मन्स पाहिल्यानंतर नोरा फतेही भावुक झाली होती. त्यानंतर तिने तिच्या प्रेमभंगाचा आणि विश्वासघाताचा अनुभव चाहत्यांसोबत शेअर केला. ती यावेळी म्हणाली,”हा तुमचा सर्वोत्तर परफॉर्मन्स नव्हता पण हा परफॉर्मन्स माझ्या हृदयाला स्पर्श करून गेला आहे.”
श्रिती झा आणि कोरिओग्राफर विवेक चचेरे यांना या डान्स परफॉर्मन्ससाठी पैकीच्या पैकी गुण मिळाले नसले तरी त्यांचा हा परफॉर्मन्स नोराच्या हृदयाला स्पर्श करून गेला आहे. या परफॉर्मन्सनंतर नोरा आपल्या अश्रूंवर नियंत्रण ठेवू शकली नाही. याचे मुख्य कारण म्हणजे डान्स परफॉर्मन्स बघत असताना नोराच्या शूटिंग दरम्यानच्या आठवणी जाग्या झाल्या आणि नंतर ती तिच्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकली नाही. यावेळी ती म्हणाली की,”या गाण्याच्या शूटिंगच्या दरम्यान मी वैयक्तिक परिस्थितीशी झुजत होते. त्यामुळे या गाण्यासोबत मी भावनिक रित्या जोडले गेलेले आहे. या गाण्याच्या शूटिंगच्या वेळी मी माझ्या सर्व भावनांसोबत सेटवर जायचे.”
नोरा फतेही आणि विकी कौशल यांचे ‘बडा पचताओगे’ हे गाणे प्रेमभंगावर आधारित आहे. त्यावेळी नोरा अंगत बेदीसोबत रिलेशनशिपमध्ये होती. दरम्यान, नोराचे नाव तिच्या सहकलाकारांसोबत जोडले जात होते. अशा परिस्थितीत ती वैयक्तिक आयुष्याबाबत गुप्तता पाळण्यास प्रधान्य देते. अंगद बेदीने नेहा धुपियाशी लग्न केले आहे. त्याला सध्या दोन मुले देखील आहेत.
महत्वाच्या बातम्या
- OnePlus 11 | ‘या’ खास वैशिष्ट्यांसह पुढच्या वर्षी लाँच होऊ शकतो OnePlus 11
- Government Scheme for Farmers | सरकारच्या ‘या’ योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळू शकतो आर्थिक लाभ
- High Blood Pressure | उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी करा ‘या’ टीप्स फॉलो
- IND vs NZ | दुसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये संजू सॅमसनला का नाही मिळाले स्थान?, कर्णधार शिखर धवनने सांगितले कारण
- Job Alert | अग्निपथ योजनेअंतर्गत भारतीय नौदलात ‘या’ पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
