Share

‘या’ कारणामुळे राज ठाकरे मास्क वापरत नसतील; रामदास आठवलेंचा खुलासा

Published On: 

मुंबई : मी मास्क घालतच नाही, असं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माध्यमांसमोर केलं होत. तसंच नाशिकच्या दौऱ्यात माजी महापौर अशोक मुर्तडक यांना चेहऱ्यावरील मास्क उतरवण्यास सांगितलं होतं. पण मास्क न वापरणाऱ्या सर्व सामान्य लोकांवर जशी कारवाई होते. त्या पद्धतीने नेत्यावर देखील कारवाई झाली पाहिजे, अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे.

‘राज ठाकरे यांनी सरकारने दिलेले आदेश पाळले पाहिजेत. पण कदाचित राज ठाकरे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आदेश पाळायचा नसेल. त्यामुळे ते मुद्दाम मास्क वापरत नसतील,’ अशी मिश्किल टिप्पणी रामदास आठवले यांनी केली.

नुकतंच सातारा येथे रामदास आठवलेंची पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी रामदास आठवलेंनी राज ठाकरेंच्या मास्क न घालण्याच्या प्रश्नाला उत्तर दिले. ‘राज्यात मास्क न वापरणाऱ्या सर्वसामान्य लोकांवर जशी कारवाई होते, त्या पद्धतीने नेत्यावर देखील झाली पाहिजे,’ असे रामदास आठवले म्हणाले.

तर आज राज ठाकरे यांच्या मास्क न घालण्याच्या भूमिकेमुळे राज्यात कोरोना वाढला असं म्हणत अॅड रत्नाकर चौरे यांनी औरंगाबादच्या क्रांतीचौक पोलिस ठाण्यात राज ठाकरे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!