Ambadas Danve | औरंगाबद : विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर पलटवार केला आहे. राज ठाकरे यांनी काल गटाध्यक्षांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर घणाघात केला. यावर अंबादास दानवे म्हणाले, “जो झेंडा आता भगवा झाला आधी कोणत्या रंगाचा होता, त्यावेळेस काय भूमिका मांडली होती. आणि आपण काय केलं. आता तुमचा भोंगा कुठे गेला..?, कोणता भोंगा बंद झाला..?, हनुमान चालीसा कुठे आहे..? भाजप ज्या पद्धतीने भूमिका मांडत आहे, त्याच पद्धतीने मनसे भूमिका मांडत आहे.”
शिवसेनेला हिंदुत्ववाद या देशात जगात शिकवण्याची गरज नाही. सरकार आलं तेव्हा औरंगाबादचे नाव संभाजीनगर केलं उस्मानाबादच नाव धाराशिव केलं. आरोग्यावर टीका करणे क्लेशदायक आहे. उद्धव ठाकरे यांना आजार होता तेव्हा बाहेर फिरणे शक्य नव्हते. एका ठिकाणी बसूनही महाराष्ट्र पुढे जाऊ शकतो. कोविड काळात उद्धव ठाकरे यांनी केलेल्या काममगिरीची दखल जगाने घेतली. उद्धव ठाकरे यांना स्वार्थ असण्याचे काही कारण नाही. पक्षाच्या स्वाभिमानासाठी जे लोक आपलाच पक्ष संपवायला निघाले जे लोक करंगळी धरून डोक्यावर नाचायला लागली. यांना योग्य वेळी धडा शिकवण्याची आवश्यकता आहे. येणाऱ्या काळात शिवसेना प्रभावीपणे काम करेल, असे प्रत्युत्तर अंबादास दानवे यांनी राज ठाकरे यांना दिले आहे.
काय म्हणाले होते राज ठाकरे –
कोणतंही काम न करता हिंदुत्व करत बसलेले त्यावेळी कुठे होते. मुख्यमंत्री पदावर असताना तब्येतीचे कारण सांगून घरी बसायचं. एकनाथ शिंदे यांनी एका रात्री कांडी फिरवली, स्वत:च्या स्वार्थासाठी दिसेल तो हात हातात घ्यायचा आणि कोपऱ्यात जाऊन बसायचं, असं करणारा मी नाही. उद्धव ठाकरेंच्या अंगावर एक तरी केस आहे का? सत्तेसाठी, स्वार्थासाठी कधी याच्यासोबत कधी त्याच्यासोबत बसतात, असं राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंची मिमिक्री देखील केली.
महत्वाच्या बातम्या :
- Winter Health Care | हिवाळ्यात शरीराला उबदार ठेवण्यासाठी करा ‘या’ गोष्टींचे सेवन
- Sanjay Raut | “राजकारण म्हणजे मिमिक्री नाही, मिमिक्रीच पाहायची तर…”; संजय राऊतांची राज ठाकरेंवर टीका
- Dry Skin Tips | हिवाळ्यात त्वचेवरील कोरडेपणा दूर करण्यासाठी रात्री झोपेपूर्वी लावा ‘या’ खास गोष्टी
- Sushma Andhare | “ईडीच्या नोटिशीनंतर ‘लाव रे तो व्हिडीओ’चा ‘बंद रे व्हिडीओ’ का झाला?”; सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंना टोला
- Devendra Fadnavis | “उद्धव ठाकरेंनी मनाचीच नाही तर जनाची पण लाज बाळगावी” ; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार


