🕒 1 min read
मुंबई: कॉर्डेलिया क्रूझ ड्रग प्रकरणातील अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनला अटक केल्यानंतर चर्चेत आलेले एनसीबीचे पंच साक्षीदार प्रभाकर साईल(Prabhakar Sail) यांचा १ एप्रिल रोजी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. यावरून राजकीय वर्तुळात संशयाच्या अनेक चर्चा रंगत असतानाच शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी आजच्या सामना अग्रलेखातून थेट एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर निशाणा साधला आहे.
प्रभाकर साईल कोण, हे एव्हाना लोकांच्या लक्षात आलेच असेल. शाहरुख खानचा पुत्र आर्यन खान याचे कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरण गाजले होते. आर्यनला ड्रग्ज प्रकरणात सरळ सरळ फसविण्यात आले. आर्यनकडे कोणतेही ड्रग्ज सापडले नाहीत, त्याने ड्रग्जचे सेवन केले नाही. तरीही एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी आर्यनला अटक करून सनसनाटी निर्माण केली. याच प्रकरणात खंडणी मागण्याचाही प्रकार घडला. आर्यनला कसे फसवले, एनसीबीचे अधिकारी धनिकांना खोट्या प्रकरणांत कसे अडकवत आहेत याचा पर्दाफाश प्रभाकर साईल याने केला.
प्रभाकर साईल हा असा एक साक्षीदार ठरला की , त्याने एनसीबी अधिकाऱ्यांचे रॅकेट उद्ध्वस्त करून देशात खळबळ माजवली. समीर वानखेडेंचा मुखवटाच या प्रभाकरमुळे फाटला. राष्ट्रवादीचे नेते व मंत्री नवाब मलिक यांनी क्रूझ ड्रग्ज प्रकरण कसे बोगस आहे हे टप्प्याटप्प्याने पुराव्यांसह बाहेर काढले. त्यातला एक महत्त्वाचा साक्षीदार प्रभाकर साईल होता. प्रभाकरमुळे केंद्रीय तपास यंत्रणांचा बनावटपणा समोर आला. असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
“त्यांनी हनुमान चालिसा जरुर लावावी पण…”, राज ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर गृहमंत्र्यांची प्रतिक्रिया
प्रभाकरच्या सत्य कथनाने कित्येक आर्यन खान बळी जाण्यापासून वाचले- संजय राऊत
मोदी यांनी पंतप्रधान म्हणून प्रभाकरच्या मृत्यूकडे गांभीर्याने पाहायला हवे; संजय राऊतांची मागणी
“टीका आणि नकला करण्याशिवाय त्यांना…”, राजे ठाकरेंच्या टीकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
