Share

अनिल परब यांच्या अडचणी आणखी वाढल्या; राज्यपालांकडून चौकशीचे आदेश

Published On: 

मुंबई – राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. भाजप खासदार किरिट सोमय्या यांच्या तक्रारीनंतर राज्यपालांच्या आदेशाने लोकायुक्त पदोन्नतीसाठी पैसे वसुलीच्या आरोपांची चौकशी करणार आहेत. यात अनिल परब यांच्या चौकशीचीही शक्यता आहे.

परिवहन विभागातील पदोन्नतीसाठी लाखो रुपयांची वसुली केल्याची तक्रार भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राज्यपालांकडे केली होती. त्यानुसार आता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी लोकायुक्तांना आदेश देऊन या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार 2 सप्टेंबरला या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.

किरीट सोमय्या यांनी राज्यातील परिवहन विभागातंर्गत कार्यरत अधिकारी बजरंग खरमाटे, वर्ध्यातील परिवहन विभाग उप प्रादेशिक अधिकारी यांनी अनिल परब यांच्या संगनमताने प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या बदल्या, पदस्थापना, प्रतिनियुक्ती, पदोन्नती प्रकरणी लाखो रुपयांची वसुली केल्याचा आरोप केला आहे. किरीट सोमय्या यांनी चार महिन्यांपूर्वी या प्रकरणाची तक्रार केली होती.

दरम्यान,आता त्यानंतर राज्यपालांनी लोकायुक्तांना चौकशीचे आदेश दिले आहेत. २ सप्टेंबरला दुपारी १२ वाजता सुनावणी होणार आहे. आरटीओ अधिकारी बजरंग खरमाटे हे अनिल परब यांचे सचिन वाझे आहे. त्याच्या मार्फत २५ लाखांपासून १ कोटींपर्यंतची वसुली केली जात होती, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!