🕒 1 min read
मुंबई : शिवसेना आणि भाजपचा रस्त्यावरील संघर्ष उभ्या महाराष्ट्राने उघड्या डोळ्याने काही दिवसांपूर्वी पाहिला. यानंतर देखील केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेनेत शाब्दिक चकमकी झडत असतानाच नुकतीच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली होती.
आधी फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि मुख्यमंत्र्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. त्यानंतर फडणवीस आणि मुख्यमंत्र्यांमध्येच चर्चा झाली. या भेटीतील तपशील गुलदस्त्यात असला तरी या भेटीमुळे तर्कवितर्कांना एकच उधाण आलं आहे.
सामना ची भाषा मिठापासून ते गोड कशी करायची याची रेसिपी आम्हाला माहित आहे..
काही "आडनाव" ऐकली..
कि शिवसेना लगेच गोड होते..
आमच्या देवेंद्रजींची 10 मिनिटं मुख्यमंत्री वेगळी भेट घेतात..
युतीची आठवण येते..
सगळ एकदम गोड गोड..
म्हणून नेहमी सांगतो..
चड्डीत राहायचं!!!— Nitesh Rane (@NiteshNRane) August 31, 2021
उद्धव ठाकरे व फडणवीस यांच्यात गुप्त चर्चा झाल्याच्या पार्श्वभूमीवर भाजप आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेवर पुन्हा एकदा टीका केली आहे.’सामना’ची भाषा मिठापासून ते गोड कशी करायची याची रेसिपी आम्हाला माहित आहे.. काही आडनाव ऐकली.. कि शिवसेना लगेच गोड होते..आमच्या देवेंद्रजींची 10 मिनिटं मुख्यमंत्री वेगळी भेट घेतात..युतीची आठवण येते..सगळ एकदम गोड गोड..म्हणून नेहमी सांगतो..चड्डीत राहायचं!!! असं म्हणत राणे यांनी सेनेला पुन्हा डिवचले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- सतर्क राहा : पुढचे ३-४ दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचे; हवामान विभागाचा अंदाज
- संतापजनक : महिला अधिकाऱ्यावर फेरीवाल्याचा जीवघेणा हल्ला; दोन बोटं तुटली
- अमेरिकन लष्कराने सोडले अफगाणिस्तान, तालिबान्यांकडून जल्लोष
- धार्मिक स्थळं बंद करण्यामागे सरकारचा हेतू काय?, राणाजगजितसिंह पाटील यांचा सवाल
- सरकारच्या नाकावर टिच्चून मनसेने मध्यरात्री दहीहंडी फोडली; पोलिसांनी 3 जणांना ताब्यात घेतले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

