टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून मोठ्या प्रमाणात सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेत इनकमिंग सुरू आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत माजी गृहनिर्माण राज्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार सचिन अहिर यांनी हाती शिवबंधन बांधले.
याच पार्श्वभूमीवर नेत्यांच्या पक्षांतराने खचून जाऊ नका, खंबीर राहा, सर्व पक्ष तुमच्या पाठिशी उभा आहे, परिसरातील जनहिताची कार्ये सुरू ठेवा असा, असे म्हणत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना भावनात्मक आवाहन केले आहे. ते वरळीतील ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी बोलत होते.
तसेच यावेळी शरद पवार यांनी कार्यकर्त्यांकडून परळी विधानसभा मतदारसंघातील सद्यस्थितीची माहिती घेतली. तसेच कार्यकर्त्यांनीही त्यांची गाऱ्हाणी पवार यांच्यापुढे मांडली.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस – राष्ट्रवादीचे अनेक नेते भाजप – सेना युतीत प्रवेश केला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस भाजप – सेना युतीची ताकद वाढत आहे. तर काँग्रेस – राष्ट्रवादी कमकुवत होताना दिसत आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

