Share

थेट हात जोडत सुभाष देसाई यांनी वनमंत्री राठोड यांच्यावर बोलण टाळल

Published On: 

औरंगाबाद : बीड जिल्ह्यातील परळीतील पूजा चव्हाण या तरूणीने पुण्यात जीवन संपवल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ही तरूणी पुण्यात शिकण्यासाठी आलेली होती. यानंतर महाविकास आघाडीमधील शिवसेना नेते व वनमंत्री संजय राठोड यांचा देखील पूजा चव्हाणच्या मृत्यूशी संबंध असल्याचा आरोप विरोधी पक्ष भाजपने केला आहे. यासंदर्भात काही कथित कॉल रेकॉर्डिंग्स देखील समोर आले आहेत.

दरम्यान, संजय राठोड २३ फेब्रुवारी वाशिममधील पोहरादेवी गडावर गेले होते. यावेळी ते पहिल्यांदा माध्यमांना सामोरे गेले. पूजा चव्हाणच्या मृत्यूनंतर नॉट रिचेबल होते. मात्र, बुधवारी ते समोर आले. यावेळी पोहरादेवी याठिकाणी संजय राठोड समर्थकांनी तुफान गर्दी केली होती. त्यामुळे कोरोनाचे नियम पायदळी तुडवल्याचे दिसून आले होते. मात्र यावेळी देखील त्यांनी माध्यमांच्या प्रश्नांना उत्तरे दिले नाहीत

या संदर्भात शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी देखील संजय राठोड प्रकरणावर बोलणे टाळले आहे. पत्रकारांनी वनमंत्री वनमंत्री संजय राठोड यांच्यावरील प्रश्न विचारला असता त्यांनी कॅमेरासमोर हात जोडले. त्यामुळे संजय राठोड यांचा पाय आणखीनच खोलात असल्याच दिसून आल.

दरम्यान, राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी करणारे विरोधक सरकारला आणि मुख्यमंत्र्यांना घेरू शकतात या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. कारवाई करण्यापूर्वी तू निर्णय घे, अशा शब्दांत पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बजावले आहे. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राठोड यांचा राजीनामा घेण्याचे निश्चित केले आहे, अशी खात्रीलायक माहिती शिवसेनेतील सूत्रांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!