औरंगाबाद : ‘ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे स्वतः निसर्गप्रेमी होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील निसर्गाचे आवड आहे. त्यामुळे कमीतकमी झाडे तोडून बाळासाहेबांचा स्मारकाचे काम याठिकाणी पूर्ण करू. जितकी झाडे तोडली गेली त्यापेक्षा जास्त झाडे लावण्याचा प्रयत्न करू. पर्यावरणप्रेमींचा हिरमोड आम्ही होऊ देणार नाही अशी ग्वाही पालकमंत्री तथा शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांनी दिली. त्यांनी शहरातील प्रियदर्शिनी उद्यानातील प्रस्तावित स्व. बाळासाहेब ठाकरे स्मृतीवनाला आज (दि.२६) भेट देऊन पाहणी केली. यावेळी पर्यावरण प्रेमींशी संवाद साधतांना त्यांनी येथील जैवविविधता टिकवण्याचे आश्वासन दिले.
प्रियदर्शिनी उद्यानातील स्मारकाचे काम तूर्त ‘जैसे थे’ ठेवण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाचे नुकतेच दिले आहेत. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री सुभाष देसाई यांनी याठिकाणी संपूर्ण उद्यानाची पाहणी केली. याठिकाणी स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाशिवाय अॅम्पीथिएटर, कॅफेटेरिया बांधण्याची मनपाची योजना आहे. मात्र, यात जास्त झाडे तोडले जाण्याची भीती पर्यावरणप्रेमींनी पालकमंत्र्यांजवळ व्यक्त केली.
यावेळी देसाई म्हणाले ‘ अॅम्पीथिएटर न बांधता फक्त चहा पाण्यासाठी छोटा कॅफेटेरिया बांधला जाईल. आज मी खास झाडांची कशाप्रकारे काळजी घेतली जात आहे हे पाहण्यासाठीच आलो आहे. बाळासाहेबांचे निसर्गावर प्रेम होते, याची आम्हाला जाणीव आहे. त्यामुळे जितकी झाडे जातील मनपा तेवढी किंवा त्यापेक्षा अधिक झाडे लावेल’ असे आश्वासन पालकमंत्री देसाई यांनी ‘प्रियदर्शिनी बचाव समिती’च्या सदस्यांना यावेळी दिले.
महत्त्वाच्या बातम्या
- राज्य मंत्रीमंडळातील मंत्र्यांकडून मराठा समाजाची चेष्टा, परिणाम वाईट होतील; आंदोलकांचा इशारा
- पदवी परीक्षा १६ मार्चपासून; सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळणार; ऑनलाइन, ऑफलानचीही सुविधा
- पाणी भरण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग; आरोपीला तीन वर्षे कारावास
- जालना जिल्ह्यात कोरोनाचे २ बळी, ८५ नव्या रुग्णांची भर, २१ जणांना डिस्चार्ज
- परभणीत चिंता वाढली! ४१ नव्या रुग्णांची नोंद, एकाचा मृत्यू
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
