Share

विधानसभा निवडणुकीत मनसे सक्रीय, ‘या’ दिवशी राज ठाकरे फोडणार प्रचाराचा नारळ

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात मनसे देखील उतरणार असल्याचं आज स्पष्ट झालं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई येथे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेत विधानसभा निवडणूक ताकदीनं लढवण्याची घोषणा केली आहे. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे 5 ऑक्टोबरला प्रचाराचा नारळ फोडणार असून त्यामुळे या विधानसभा निवडणुकीतही मनसे पक्ष सत्ताधाऱ्यांचे धाबे दणाणून सोडणार असल्याचं दिसत आहे.

मनसेमध्ये नेत्यांचे प्रवेश झाल्यानंतर राज ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी राज यांनी किती उमेदवार निवडणूक लढवणार? याविषयी कोणतिही माहिती दिली नाही. तसेच कोणत्या मुद्द्यांवर निवडणूक लढवणार हेदेखील सांगितले नाही. राज म्हणाले, ‘हळू हळू तुम्हाला मी सगळी माहिती देत जाईन. थोडा धीर धरा. योग्य वेळी तुम्हाला सगळं सांगणार आहे.’ त्याचवेळी राज ठाकरे यांनी येत्या ५ तारखेला पहिली जाहीर सभा घेणार असल्याचेही सांगितले. राज ठाकरे म्हणाले, ‘मी सगळं बोलणार आहे. इतके दिवस मी का बोललो नाही, हेदेखील स्पष्ट करणार आहे.’

दरम्यान लोकसभा निवडणुकीत मनसेने प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली होती. त्यावेळी मनसेने मात्र भाजप विरोधी प्रचाराचा धडाका लावला होता. मनसेने ठिकठिकाणी सभा घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा या जोडगोळीचा चांगलाच समाचार घेतला होता. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत मनसेची भूमिका काय असेल हे देखील आता स्पष्ट होणार आहे.

महत्वाच्या बातम्या

https://twitter.com/Maha_Desha/status/1178581123128971265?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1178580106643525632?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1178578854987714560?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!