Share

मराठवाड्यात पावसाचा हाहाकार; नुकसानीच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री करणार दौरा

Published On: 

मुंबई : मराठवाड्यात गेल्या सात दिवसांपासून पावसाने हाहाकार केला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे मराठवाड्याचा दौऱ्यावर आहेत. परळी येथे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडेसह जयंत पाटलांनी पूरस्थितीची शेतातील नुकसानीची पाहणी केली आहे. दरम्यान आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील नुकसानीच्या पाहणीसाठी करण्यासाठी मराठवाड्याचा दौरा करणार असल्याची माहिती राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.

मराठवाड्यात गेल्या दोन दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. या परिस्थीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री लवकरच या भागाचा दौरा करणार आहेत. मुख्यमंत्री कार्यालयानं तसं कळवलं आहे, अशी माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली. यंदाच्या पावसाळ्यात राज्यभरात अतिवृष्टीमुळं झालेल्या नुकसानीच्या माहितीसाठी वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषद घेतली, यावेळी ते बोलत होते.

दरम्यान यावर्षी सातत्याने पूर, अतिवृष्टीमुळे 436 नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. तसेच 196 जणांचे केवळ वीज पडून मृत्यू झाले आहेत. मराठवाड्यातील 10 पैकी 7 जिल्ह्यांमध्ये 180 टक्के पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. अजूनही 436 पैकी 6 मृतदेह मिळालेले नाहीत. तसेच 136 जण जखमी झाले आहेत, अशी माहिती देखील यावेळी विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!