टीम महाराष्ट्र देशा- मुंबई आणि उपनगरात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे मालाड, अंधेरी आणि दहिसरसह उपनगरातील अनेक ठिकाणी, वाहतूक आणि रेल्वे सेवा मंदावली आहे. आज दुपारी समुद्रात मोठी भरती असल्यानं किनाऱ्यावर सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
नवी मुंबई आणि ठाण्यातही जोरदार पाऊस सुरु आहे. रायगड जिल्ह्यात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनानं शाळांना सुटी जाहीर केली आहे. पुण्यात आज पहाटे झालेल्या जोरदार पावसानंतर, सध्या पावसानं काहीशी उसंत घेतली आहे. मात्र काल रात्रभर झालेल्या पावसानं धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली असून, आज सकाळी 11 वाजता, खडकवासला धरणातून 27 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे.
अतिवृष्टीसारख्या आपत्कालीन परिस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांनी सुट्टी जाहीर केली असल्यास, शाळाअंतर्गत फेरपरीक्षा घेण्याचे अधिकार मुख्याध्यापकांना, आणि बोर्डाच्या परीक्षा घेण्याचे अधिकार राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ तसंच राज्य परीक्षा परिषदेला राहतील, असा शासन निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे दहावी आणि बारावीची फेरपरीक्षा चुकलेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षाही पुन्हा घेण्यात येणार आहेत.

मुंबईच्या साकीनाका भागात काल एका चाळीची भिंत कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर एकजण जखमी झाला आहे. बृहन्मुंबई महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागानं ही माहिती दिली आहे.
गडचिरोली जिल्ह्यात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत असल्यानं पर्लकोटा नदीला पूर आला आहे, त्यामुळं भामरागड तालुक्याचा संपर्क तुटला आहे. हेमलकसा-आलापल्ली हा मार्गही पुन्हा बंद झाला आहे. तर औरंगाबाद शहरासह जिल्ह्यातही आज सकाळपासून पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यात आज सलग दहाव्या दिवशी जोरदार पाऊस झाला, पंचगंगा नदीसह जिल्ह्यातल्या सर्व नद्यांची पूरस्थिती कायम आहे. जिल्हा प्रशासनानं अतिदक्षतेचा इशारा दिला असून, ४८ कुटूंबांना आणि ३३० जनावरांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. परभणी जिल्ह्यात जिंतूर तालुक्यासह आज सुमारे अर्धातास जोरदार पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
महत्वाच्या बातम्या
अमित शहांचा उदयनराजेंना फोन, दिल्लीत भेटीचे दिले आमंत्रण
मुंबईची विमानसेवा सुरु ; मात्र रेल्वेसेवा अजूनही बंदच
जाणून घ्या राज्यातील पावसाची स्थिती फक्त एका क्लिकवर
विश्रांतीनंतर राज्यात मान्सून पुन्हा सक्रीय होणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

