Share

अमित शहांचा उदयनराजेंना फोन, दिल्लीत भेटीचे दिले आमंत्रण

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरवात झाली आहे. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अनेक नेत्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय समीकरण आता भाजपच्या बाजूने जात आहेत. तर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष दिवसेंदिवस अडचणीत जात आहे. त्यातच आता भाजपचे मास्टरमाइंड आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी खा. उदयनराजे भोसले यांना चक्क फोन करून भेटीचे आमंत्रण दिले आहे. त्यामुळे आता अमित शहा हे उदयनराजेंना भाजपवासी करतात की काय अशा चर्चा रंगली आहेत.

याबाबतचे वृत्त NEWS18 या वृत्त वाहिनीने प्रसिद्ध केले आहे. यामध्ये पुण्याचे खा. गिरीश बापट यांच्यामार्फत खा. उदयनराजे भोसले यांना फोन करण्यात आला. बापट यांनी अमित शहांना बोलयाचे असल्याचे सांगितले. त्यानंतर अमित शहा यांनी महाराजांची विचारपूस केली व दिल्ली येथे भेटीचे आमंत्रण दिले. अमित शहा आणि उदयनराजे यांच्यातल्या झालेल्या या संभाषणामुळे राजकीय चर्चना उधान आले आहे.

नुकतेचं साताऱ्याचे आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपत प्रवेश केला आहे. त्यामुळे साताऱ्यातील राष्ट्रवादीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. मात्र आता थेट अमित शहा यांनी उदयनराजेंना फोन केल्याने आता उदयनराजे देखील भाजपात जाणार की काय ? अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.

अमित शहा याचं एक पाऊल मागे आता म्हणतात भाजप-सेना एकत्रच

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!