🕒 1 min read
नवी दिल्ली : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने लॉकडाऊन लागू केला. मात्र तरीही वाढत्या रुग्ण संख्येवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले नाही. लॉकडाऊन मुळे अर्थव्यस्थेची गाडी घसरल्याने यात काही प्रमाणात शिथिलता देण्यात आल्याने जनजीवन पूर्वपदावर येताना दिसत आहे. हळूहळू सर्व सेक्टर सुरू होत असताना रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे.
महानगरपालिकेची सभा संपता संपेना, महापौरांच्या अट्टाहासामुळे नागपूरकरांचे जीव धोक्यात
यापूर्वी नियमित रेल्वे गाड्या ३० जूनपर्यंत रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता आणि त्यासंदर्भात १५ मे रोजी अधिसूचना देखील काढण्यात आली होती. मात्र, आता देशभरात कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे आणि त्यामुळेच भारतीय रेल्वेने नियमित प्रवासी रेल्वे गाड्या १२ ऑगस्टपर्यंत बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
It has been decided that regular time-tabled passenger services including Mail/Express, passenger and suburban services stand cancelled up to 12.08.2020: Railway Board pic.twitter.com/Pt1EIreC5y
— ANI (@ANI) June 25, 2020
रेल्वेने लॉकडाऊन वाढविला असून 12 ऑगस्टपर्यंत नियमित रेल्वेचा प्रवास करता येणार नाही. म्हणजेच पॅसेंजर, मेल एक्स्प्रेस, उपनगरीय रेल्वे गाड्या 12 ऑगस्टपर्यंत धावणार नाहीत. याशिवाय, जर कोणी 12 ऑगस्टपर्यंत नियमित ट्रेनचे बुकिंग केले असेल तर त्याला 100% परतावा मिळणार आहे.
राजकीय दबावापोटी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली, पण विजय सत्याचाचं होतो – तृप्ती देसाई
कोरोनामुळे गेल्या 3 महिन्यांपासून रेल्वेची सामान्य सेवा बंद आहे. या काळात प्रवासी मजूर आणि अत्यावश्यक सेवेसाठी विशेष गाड्या, आणि लोकल सेवा सुरू करण्यात आली. मात्र सामान्य लोकांना रेल्वेने प्रवासासाठी अजून वाट पहावी लागणार आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
