Share

महानगरपालिकेची सभा संपता संपेना, महापौरांच्या अट्टाहासामुळे नागपूरकरांचे जीव धोक्यात

Published On: 

नागपूर : महापौर संदीप जोशी यांच्या अट्टाहासामुळे नागपूरकरांचा जीव धोक्यात आला आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या नावाखाली त्यांनी गेल्या चार दिवसांपासून प्रशासकीय यंत्रणेला वेठीस धरल्याचे चित्र आहे. नागपूरात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यासह सर्व प्रशासकीय यंत्रणा सभेत गुंतून पडल्याने नागरीकांचे जीव धोक्यात आले आहेत.

‘गोपीचंद पडळकरांचं वक्तव्य फडणवीसांच्या ‘मन की बात’ तर नाही ना’

कोविडच्या संकटात महानगरपालिकेची यंत्रणा सक्रीय करण्यात आली आहे. यात आरोग्य विभागाव्यतिरिक्त इतर विभागांचे अधिकारी व कर्मचारी यांच्यावर महत्वाची कामे सोपविण्यात आली. मात्र गेल्या पाच दिवसांपासून अनेक महत्वाचे अधिकारी सभेत अडकून पडले आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष फिल्डवर गोंधळ उडत आहे.

आरोग्य विभागाचे अनेक अधिकारी सभेत व्यस्त असल्याने कोरोना रेड झोनमधील सर्वेक्षण, विलगीकरण ही कामे संथ झाली आहेत. पाच दिवसांपासून महापालिकेच्या सभागृहात स्थगन प्रस्तावावर चर्चा सुरु आहे. कांग्रेस नगरसेवक नितीन साठवणे यांनी सतरंजीपूरा परिसरातील विलगीकरण प्रक्रियेत अडथळे आणले होते. मनपाने केलेल्या पोलीस तक्रारीवरुन त्यांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा मागे घेतला जावा हा मुद्दा नगरसेवकांनी लावून धरला आहे. शिवाय तुकाराम मुंढे यांची कार्यप्रणाली हा नगरसेवकांच्या टार्गेटचा विषय आहे.

…अन्यथा बियाणे उत्पादक कंपन्यांवर गुन्हे दाखल करणार – पालकमंत्री संजय राठोड

गेल्या चार दिवसांपासून याच एकमेव विषयावर मनपा सभागृहात चर्चा सुरु आहे. यात भाजप नगरसेवकांची लांबलचक भाषणे चर्चेचा विषय ठरली आहेत. भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी आज तब्बल सव्वा तीन तास भाषण केले. उद्याही ते आपले बोलणे सुरु ठेवतील. याशिवाय इतर नगरसेवकांची भाषणे शिल्लक असल्याने मनपाची सभा आणखी काही दिवस चालण्याची शक्यता आहे. नगरसेवकांच्या भाषणानंतर आयुक्त तुकाराम मुंढे या चर्चेवर उत्तर देतील.

आम आदमी पक्षाची महापौरांविरुद्ध पोलीस तक्रार

महापौर संदीप जोशी यांनी सर्वसाधारण सभेच्या नावावर नागपूरकरांचा जीव धोक्यात घातल्यामुळे त्यांच्यावर साथरोग प्रतिबंध कायद्यानुसार कारवाई व्हावी अशी मागणी आम आदमी पक्षाने आपल्या तक्रारीत केली आहे.

सोशल मिडीयावर महापौर ट्रोल

सोशल मिडीयावर नागपूरकरांनी महापौर संदीप जोशी यांना लक्ष्य केले आहे. मनपा आयुक्त व अधिकारी वर्ग काम करण्यासाठी आहेत कि नगरसेवकांची भाषणे ऐकण्यासाठी हा सवाल सोशल मिडीयावर उपस्थित केला जात आहे. काही नेटकर्‍यांनी ही सर्वसाधारण सभा नव्हे तर महापालिकेचे पावसाळी अधिवेशन असल्याची टीका केली आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!