Share

राजकीय दबावापोटी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली, पण विजय सत्याचाचं होतो – तृप्ती देसाई

Published On: 

🕒 1 min read

पुणे : प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प निवृत्ती महाराज देशमुख ( इंदुरीकर ) यांनी कीर्तनातून वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंदोरीकर महाराज यांच्या विरोधात संगमनेर शहर वैद्यकीय अधिकारी भास्कर भवर यांच्या फिर्यादीवरून संगमनेर कोर्टात PCPNDT अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इंदोरीकर महाराज यांनी आपल्या कीर्तनात ‘स्त्रीसंग सम तिथीला झाला, तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते’ असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. इंदुरीकरांच्या किर्तनाचा व्हिडिओ ‘मराठी कीर्तन व्हिडिओ’ या युट्यूब चॅनेलवर अपलोड करण्यात आला होता. या व्हिडिओ इतर सोशल माध्यमांवरही चांगलाच गाजला होता. त्यावरून त्यांच्यावर अनेकांनी टीकाही केल्या होत्या.

या विधानावरून इंदुरीकर यांनी PCPNDT कायद्याच्या कलाम 22 चं उल्लंघन असल्याचा आरोप करत अहमदनगर इथल्या PCPNDT च्या सलागर समितीच्या सदस्यानि त्यांना नोटीस पाठवली होती. यावर इंदुरीकर महाराज यांनी आपल्या वकिलांन मार्फत बाजू मंडली होती. त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या रंजना गावंदे यांनी नोटीस दिली हाती. त्यामध्ये प्रशासनाने गुन्हा दाखल न केल्यास तुम्हालाही दोषी धरण्यात येईल अशी नोटीस दिली होती.

त्यामुळे अखेर 19 जूनला संगमनेर इथल्या वैद्यकीय अधिकारी भास्कर भवर यांनी कोर्टात गुन्हा दाखल केला. खरंतर इंदुरीकरांच्या या विधानामुळे वाद चांगला तापला होता. कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या विधानावरून सुरू असलेला वाद थांबता थांबेना, असंच चित्र होतं. यात भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यादेखील आक्रमक झाल्या होत्या. त्यांनी आपल्या वकिलामार्फत इंदुरीकर महाराजांना कायदेशीर नोटीस पाठवली होती.

इंदुरीकर महाराजांना ‘ते’ वक्तव्य भोवलं, अखेर गुन्हा दाखल

यावर आता इंदुरीकर महाराज यांच्या विरोधात रान उठवणाऱ्या भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. इंदुरीकरांवर कीर्तनातून पुत्रप्राप्तीचा संदेश दिल्यामुळे पीसीपीएनडीटी ऍक्टनुसार आणि वारंवार कीर्तनातून महिलांचा अपमान करीत असल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी भुमाता ब्रिगेडने तसेच इतर काही संघटनांनी केली होती. मात्र राजकीय दबावापोटी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली जात होती. परंतु कीर्तनातून पुत्रप्राप्तीचा संदेश देणाऱ्या इंदुरीकरांवर आता संगमनेर न्यायालयात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरताना प्राचीन ग्रंथांचा आधार या वाक्याला आहे असे सांगितले जात होते .परंतु पुत्रप्राप्तीचा सल्ला देणे,जाहिरात करणे हे पीसीपीएनडीटी ऍक्ट नुसार कायदेशीर गुन्हा असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे होते. अस तृप्ती देसाई म्हणाल्या आहेत.

कारवाईला टाळाटाळ करण्यासाठी तसेच मी किती योग्य आहे हे दाखवण्यासाठी हा वाद मुद्दामहून काही संबंध नसताना वारकरी संप्रदायाशी जोडण्याचा प्रयत्न केला गेला, हिंदुत्वाशी जोडण्याचा प्रयत्न केला गेला, आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी आवाज उठवल्यावर खालच्या पातळीवर बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला परंतु शेवटी सत्याचाच विजय होत असतो, इंदुरीकरांवर आता संगमनेर न्यायालयात गुन्हा दाखल झालेला आहे आता त्याची सुनावणी होईल आणि सर्व सत्य जनतेसमोर बाहेर येईल अस देखील तृप्ती देसाई म्हणाल्या आहेत.

भाजपाने पोसलेलं गिधाड आमदार झाल्यामूळे ‘हर्षवायु’ झालाय, राष्ट्रवादीची रणरागिणी कडाडली

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!