🕒 1 min read
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात उभारण्यात येत असलेला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची पायाभरणी स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड येथील माती आणि समतेचा संदेश देणाऱ्या महाड येथील चवदार तळ्यातील पाण्याने मंगळवारी (दि.७) करण्यात आली.
विद्यापीठातील मुख्य इमारतीसमोर आयोजित कार्यक्रमात कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या हस्ते रायगडावरील माती आणि चवदार तळ्याचे पाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या पायात टाकण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल नियुक्त अधिसभा सदस्य ॲड. विजय सुबुकडे पाटील होते. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. श्याम शिरसाट, कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी यांची उपस्थिती होती.
अॅड. सुबुकडे पाटील यांनी सामाजिक समतेचा संदेश देण्यासाठी रायगड किल्ल्यावरील माती आणि पाण्याचा संगमाचा साक्षीदार महाड येथील चवदार तळ्यातील पाणी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पायाभरणीत टाकण्याचा संकल्प केला होता. यानुसार पंचधातूमध्ये माती आणि पाणी आणले होते. हे माती व पाणी पुतळ्याच्या पायाभरणीत कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या हस्ते टाकण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल दांडगे यांनी केले. कार्यक्रमाला नागराज गायकवाड, विजय वाहूळ, मोहसीन खान आदींची उपस्थिती होती.
महत्त्वाच्या बातम्या
- लेखिका पद्मा लक्ष्मीने शेअर केला ‘नान बेडशीट’चा फोटो, नेटकरी म्हणाले..’सकाळी उठल्याबरोबर..’
- एसटी संपाची महिनापूर्ती; औरंगाबादेत महिनाभरात ३६ कर्मचारी निलंबित, २८ चालक-वाहक रुजू
- मोठी बातमी! हेलिकॉप्टर अपघातात आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू
- औरंगाबादेत जिल्हाधिकारी, आयुक्तांची रस्त्यावर उतरुन जनजागृती
- बाजार समितीच्या विरोधात राष्ट्रवादीला हाताशी धरुन भाजपच्या तक्रारी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
