पुणे : इन्कमटॅक्स विभागाने पश्चिम महाराष्ट्रातील चार मोठ्या साखर कारखान्यांवर छापा मारला आहे. यावरुन जयंत पाटील यांनी भाजपावर टीका केली आहे. लखीमपूर हिंसेवरुन दुसरीकडे लक्ष वळवण्यासाठीच साखर कारखान्यांवर छापे टाकण्यात आले आहेत. असा दावा जयंत पाटलांनी केला आहे.
जयंत पाटील पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले, लखीमपूरला जी घटना घडली त्यावर आम्ही तीनही पक्षांनी खेद व्यक्त केला आहे. सोमवारी आम्ही महाराष्ट्र बंदची हाक दिली म्हणून भाजपने संतापून ही प्रतिक्रिया दिली आहे. जालियनवालाबाग हत्याकांडासारखाच हा प्रकार आहे. त्यामुळेच जनतेचे लक्ष दुसरीकडे वेधण्याचे काम सुरु आहे. या घटनेला भाजप जबाबदार असल्याचेही जयंत पाटील म्हणाले.
पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले, भाजपचे नेते आमच्या नेत्यांचे नाव घेतात, त्यानंतर ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय धाडी टाकतात, आमच्या नेत्यांना बदनाम करण्यात भाजपचे षडयंत्र आहे. यात काही शंका नाही. भाजपाने एवढा धसका का घेतला? हा प्रश्न विचार करण्यासारखा आहे असेही पाटील म्हणाले.
अजित पवारांकडे दडवण्यासारखं काहीच नाही. ते कधीच काही दडवत नाहीत. या कारखान्याशी अजित पवारांचा संबंध आहे की नाही माहीत नाही. बऱ्याच कारखान्यांशी त्यांचा संबंध नाही हे त्यांनी स्पष्ट केले असेही पाटील म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- मराठा व ओबीसींबाबत दुटप्पीपणामुळे भाजपला फटका; पोटनिवडणुकीबाबत अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया
- ‘महाविकास आघाडीवर जनतेचा विश्वास वाढतोय, मुंबई महापालिकेवर एकत्र लढण्याचा विचार’
- देवेंद्र फडणवीस तब्बल ८ लाख भाजपा कार्यकर्त्यांशी ऑनलाईन संवाद साधणार
- औरंगाबादेत पुन्हा बरसला जोरदार पाऊस, झाडे कोसळून वाहने चकनाचूर!
- दोन दिवसांच्या अंधारानंतर लातूरमधील ‘त्या’ गावांचा विद्युत पुरवठा सुरळीत


