Share

राहुल गांधी राजकारणात पुन्हा सक्रीय, वर्ध्यात पदयात्रा काढणार

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुक २१ ऑक्टोबरला होणार आहे. तर २४ ऑक्टोबरला मतमोजणी  होणार आहे. त्यामुळे राजकीय पक्ष चांगलेच तयारीला लागलेले आहेत. अनेक नेते विविध ठिकाणी जाऊन प्रचार करत आहेत. आपण केलेल्या कामाची पोचपावती जनतेला देत आहेत.

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हेही सक्रीय होणार आहेत. राहुल गांधी हे गांधी जयंतीच्या निमित्ताने काँग्रेस देशभरात पदयात्रा काढणार आहे. काँग्रेसचे नेते या पदयात्रांचं नेतृत्त्व करणार आहेत.  राहुल गांधी देखील यामध्ये सहभागी होणार असून ते वर्ध्यात पदयात्रा करणार असल्याची महिती आहे.

या पद यात्रेच्या निमित्ताने राहुल गांधी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात करू शकतात. त्यामुळे या कार्यक्रमाचे आयोजन सध्या होत असल्याची माहिती आहे. आतापार्यात्न भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीने प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यात कॉंग्रेस कुठेतरी मागे पडलेली दिसत आहे. त्याला राहुल गांधी उभारी देणार आहेत.

दरम्यान, लोकसभा लोकसभा निवडणुकीवेळी राहुल गांधी हे कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. त्यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसचा दारूण पराभव झाला. तसेच त्यांचाही अमेठी येथून पराभव झाला होता. त्यामुळे त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ते प्रथमच प्रचारात सहभागी होणार आहेत.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!