टीम महाराष्ट्र देशा – देशात कोरोना विषाणूचा फैलाव वेगाने होत आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून कोरोनाच्या फैलावावर अटकाव घालण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न होताना दिसत आहे. पंतप्रधान मोदी यांनी संपूर्ण देशात २१ दिवसाचा लॉक डाऊन जाहीर केलं असून त्याची अंमलबजावणी सुरु झाली आहे.
कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी कोरोनाशी सामना करण्याची ‘दोन पातळ्यांवरील रणनीती’ सुचवली आहे. ते म्हणतात आपल्या देशात कमीत कमी लोकांना जीव गमवावा लागेल यासाठी कोरोना विशाणुशी ही लढाई आपण दोन पातळ्यांवर लढली पाहिजे. पहिली म्हणजे कोरोनाचा फैलाव कमीत कमी राखण्यात येणे. आणि दुसरी म्हणजे कोरोनामुळे आर्थिक फटका बसणार्यांना मदत करणे. यात त्यांनी छोटे व्यावसायिक आणि रोजंदारीवरील व्यक्तींचा विशेष उल्लेख केला आहे.
आपल्या ट्वीटरवर राहुल गांधी यांनी म्हटलंय,’आपला देश # कोरोनाव्हायरस बरोबर युद्ध लढत आहे. आज प्रश्न आहे की आपण काय करावे जेणेकरून आपल्याला कमीत कमी लोकांचे जीव गमवावे लागतील ? परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याची सरकारची मोठी जबाबदारी आहे. मला वाटते की आपली रणनीती दोन भागात विभागली गेली पाहिजे :’
हमारा देश #Coronavirus से युद्ध लड़ रहा है। आज सवाल ये है कि हम ऐसा क्या करें के कम से कम जानें जाएँ? स्तिथि को नियंत्रण में करने के लिए सरकार की बहुत बड़ी ज़िम्मेदारी है। मेरा मानना है कि हमारी रणनीति दो हिस्सों में बँटी हो: pic.twitter.com/edziMEAiXy
— Rahul Gandhi (@RahulGandhi) March 25, 2020
‘१ ) कोरोना / कोविड-१९ शी लढाई –
अ. संक्रमण टाळण्यासाठी एकांतात राहणे आणि रूग्णांची मोठ्या प्रमाणात तपासणी करणे.
ब. शहरी भागात मोठ्या आपत्कालीन तात्पुरत्या रुग्णालयाचा त्वरित विस्तार. या रुग्णालयामध्ये संपूर्ण आयसीयू सुविधा उपलब्ध असावी.’
Covid 19 से जमकर जूझना
a. संक्रमण रोकने के लिए एकांत में रहना और बड़े पैमाने पर मरीज़ों की टेस्टिंग करना।
b. शहरी इलाक़ों में विशाल आपातकालीन अस्थाई हॉस्पिटल का तुरंत विस्तार करना। इन चिकित्सा क्षेत्रों में पूर्ण ICU की सुविधा उपलब्ध हो।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) March 25, 2020
२ ) अर्थव्यवस्था –
‘अ. रोजंदारीवरील कामगारांना तातडीने मदतीची आवश्यकता असते. त्यांच्या खात्यावर थेट रोख रक्कम हस्तांतरण केले जावे. त्यांना मोफत रेशन उपलब्ध करून द्यावे . यात कोणताही विलंब अश्या लोकांसाठी खूप त्रासदायक असेल.
ब. व्यवसाय ठप्प आहे म्हणून कर सवलत, आर्थिक मदत द्यावी जेणेकरुन नोकर्या वाचतील. छोट्या व्यावसायिकांना सरकारकडून ठोस आश्वासन मिळावे.’
अर्थव्यव्स्था
a. दिहाड़ी मज़दूरों को फ़ौरन सहायता चाहिए।उनके अकाउंट में Direct कैश ट्रांसफ़र हो।राशन मुफ़्त उपलब्ध हो।इसमें कोई भी देरी विनाशकारी होगी।
b. व्यापार ठप है।टैक्स छूट मिले, आर्थिक सहायता भी मिले ताकि नौकरियाँ बच जाएँ।छोटे-बड़े व्यापारियों को ठोस सरकारी आश्वासन मिले।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) March 25, 2020
हेही पहा –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

