🕒 1 min read
नवी दिल्ली : गेले आठ महिने देशासह जगभरात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. कोट्यवधी लोकांना या रोगाचीलागण झाली तर लाखो लोकांना आपले प्राण गमवावे लागले. या रोगावर ठोस औषध नसल्याने करण्यात आलेल्या ताळेबंदीमधून सावरत असतानाच दुसऱ्या लाटेची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवल्यामुळे पुन्हा उलट-सुलट चर्चांना सुरुवात झाली आहे.
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज (शुक्रवार) देशातील कोरोना स्थितीसंदर्भात सर्वपक्षीय बैठक होणार आहे. यावेळी भविष्यातील कोरोना लसीच्या वितरणासंदर्भातही चर्चा होण्याची शक्यता आहे. ही बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमाने होईल.
काँग्रेसकडून अधीर रंजन चौधरी आणि गुलाम नबी आझाद या बैठकीत असणार आहेत. यावरच काँग्रेस नेते व खासदार राहुल गांधी यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. या मुद्द्याबाबत बोलताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एक ट्विट करत पंतप्रधानांकडून एका गोष्टीची स्पष्टता मागितली आहे. ‘ आजच्या या बैठकीत प्रत्येक भारतीयाला करोनावरील लस मोफत स्वरूपात कधी उपलब्ध करून देणार याची पंतप्रधान मोदी यांनी स्पष्टता करावी, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे.
In today's all-party meeting, we hope the PM clarifies by when will every Indian get free Covid vaccine.
हमें आशा है कि आज सर्वदलीय बैठक में PM ये स्पष्ट करेंगे कि हर भारतीय को मुफ़्त कोरोना वैक्सीन कब तक दी जाएगी।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) December 4, 2020
महत्वाच्या बातम्या
-
सहा महिन्यांचे राशन घेऊन आलोय, आता मागे हटणार नाही; द ग्रेट खली आक्रमक!
-
धुळे-नंदुरबारच्या निकालावरुन महाविकास आघाडीचे भविष्य काय असेल हे स्पष्ट झाले : प्रवीण दरेकर
- मागे हटा नाहीतर खुर्च्या खाली करा शेतकऱ्यांनी केंद्राला गुडघ्यावर आणलं; शिवसेनेचा निशाणा
- ‘हे मुख्यमंत्र्यांचे कौतुक की अब्रू काढणे फक्त पवारच सांगू शकतात’, भाजपचा ठाकरे सरकारला टोला
- आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली कोरोनावरील चर्चेसाठी सर्वपक्षीय बैठक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
