Share

#Avni : म.गांधीचा विचार ट्विट करत राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई – वनविभागाच्या शोध पथकाला गुंगारा देणाऱ्या नरभक्षक वाघिणीला ठार करण्यात आलं. तिनं आतापर्यंत 13 जणांचा जीव घेतला होता. मात्र टी-1 वाघिणीच्या मृत्यूनंतर वन्यजीव प्रेमींनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.आता याच मुद्द्यावरून कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

राहुल गांधींनी महात्मा गांधीचा विचार ट्विटमध्ये लिहिलाय. ते लिहितात, ‘ देशातल्या प्राण्यांना कशी वागणूक मिळते, यावरून त्या देशाचा मोठेपणा सिद्ध होतो. – महात्मा गांधी’ . यावरूनच अवनीला मारण्याबद्दलची राहुल गांधींची नाराजी व्यक्त होतेय.

दरम्यान,याच मुद्द्यावरूनशिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ट्वीटरवरून वन मंत्रालयावर केली आहे.वाघिणीला मारण्याची न्यायालयाकडून परवानगी होती का? तिला बेशुद्ध करून पकडता आलं नसतं का? एक वन्यजीवप्रेमी म्हणून आपल्याला पडलेले हे प्रश्न आहेत. मात्र आज अवनीला ठार केलं. उद्या तिच्या बछड्यांचा किंवा आणखी दुसऱ्या वाघाचा बळी घेतला जाईल असं म्हटलं आहे.

चंद्रपुरातील ‘अवनी’ वाघिणीला ठार केल्यानंतर भाजप नेत्या आणि केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री मनेका गांधी यांनी संताप व्यक्त केला आहे. ‘या प्रकरणी मी राजकीय आणि कायदेशीर कारवाईचा विचार करत आहे,’ असंही मनेका गांधी यांनी ट्वीट करत म्हटलं आहे.

‘वाघिणीची हत्या केल्याने मी खूप दु:खी झाली आहे. चंद्रपुरात शहाफत अली खान यानं आतापर्यंत 3 वाघ, 10 बिबट्या, अनेक हत्ती आणि जवळपास 300 रानडुकरांची हत्या केली आहे. अशा माणसाला तुम्ही अमानवी कृत्य करण्यासाठी कसं काय नेमू शकता,’ असा सवाल राज्य सरकारला विचारत मनेका गांधी यांनी ट्विटरवरून आपला संताप व्यक्त केला आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!