🕒 1 min read
बीदर : एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी अयोध्येत बांधल्या जाणाऱ्या मशिदीत नमाज अदा करण्याला ‘हराम’ म्हटल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. कर्नाटकच्या बीदरमध्ये मंगळवारी ओवैसींनी हे वादग्रस्त वक्तव्य केले.
ओवैसी म्हणाले, ‘बाबरी मशिदीच्या जागी पाच एकर जमीन घेऊन मशीद बांधत आहेत आणि एका स्वातंत्र्यसैनिकाचे, अहमदुल्लाचे नाव तिला देऊ इच्छित आहेत. अरे दुष्टांनो, ओंजळभर पाण्यात बुडून मला… जर ते जिवंत असते तर तेही म्हणाले असते की… मी प्रत्येक धर्माच्या ज्येष्ठांना विचारले, मुफ्तींना विचारले, जबाबदार लोकांना विचारले. प्रत्येकाचे म्हणणे आहे की तिथे नमाज पढता येणार नाही.
ज्या जागी बाबरी मशिदीच्या हौतात्म्यानंतर पाच एकर जमिनीवर मशीद बांधली जात आहे तिथे नमाज पढणेही हराम आहे.’पाखंड्यांचा समुदाय जो बाबरी मशिदीच्या बदल्यात 5 एकर जमिनीवर मशीद बांधत आहे तो मशीद नाही तर ‘मस्जिद-ए-ज़ीरार’ आहे असे ते म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले,मुहम्मदुर रसूलुल्लाहच्या काळात या पाखंड्यांनी मुसलमानांना मदत करण्याच्या नावाखाली एक मशीद बांधली होती. वास्तविक त्यांचा हेतू त्या मशिदीत नबीचा खात्मा आणि इस्लामला नुकसान करण्याचा होता.अशा मशिदीत नमाज पढणे आणि त्यासाठी देणगी देणे हे हराम आहे.
महत्वाच्या बातम्या
- माहूरमधील रेणुकादेवी मंदिरात महिला पुजाऱ्यांना स्थान द्या, तृप्ती देसाईंची मागणी
- आरक्षणापासून मराठा समाज वंचित राहावा यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न – शिवेंद्रराजे भोसले
- ‘…तर असा बदनामीकारक मजकूर आपण कधीच ट्विटमध्ये वापरला नसता’
- ऑस्ट्रेलियाच्या बॉलरचा सामना करणं सगळ्यात कठीण नव्हतं, मात्र…
- ‘या’ जागेसाठी विधानसभा निवडणुकीत झाली फिक्सिंग, भाजप नेत्याचा गौप्यस्फोट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

