औरंगाबाद : राज्यातील ५ पदवीधर मतदारसंघांसाठी १ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया होत आहे. आचारसंहिताही लागू करण्यात आली आहे. ३ डिसेंबर रोजी निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. निवडणुकीसाठी 5 नोव्हेंबरपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 नोव्हेंबर आहे. 13 नोव्हेंबरला आलेल्या अर्जांची छानणी होणार आहे. तसेच अर्ज मागे घेण्याची तारीख 17 नोव्हेंबर आहे.
राज्यात कोरोना काळानंतर होणाऱ्या या पहिल्याच निवडणूक असल्याने अधिक महत्व प्राप्त झाले आहे. तसेच, विधानपरिषदेतील संख्याबळ वाढवण्यासाठी सर्वच पक्ष प्रयत्न करत आहेत. आज औरंगाबादमध्ये पदवीधर मतदारसंघातून पंकजा मुंडे यांचे कट्टर समर्थक असलेल्या शिरीष बोराळकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी, भाजप नेत्या व माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे देखील उपस्थित होते.
यानंतर, त्यांनी पक्षातील कार्यकर्त्यांची व पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यामध्ये कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, ‘अमेरिकेसारख्या महासत्ता देशाच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव झाला मात्र बिहारमधील निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचा विजय झाला. म्हणजेच सर्वात शक्तिशाली नेतृत्व नरेंद्र मोदी यांचं आहे.’ यासह त्यांनी पदवीधर मतदार संघ निवडणुकीत देखील भाजपला विजयी करायचं आहे असं सांगत दानवेंनी मार्गदर्शन केलं.
महत्वाच्या बातम्या
- लवकरच महाराष्ट्रात सरकारचे फटाके वाजतील, नारायण राणेंचे मोठे विधान
- ‘शरद पवार यांच्या आशीर्वादाने आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हे सरकार पाच वर्षे पूर्ण करेल’
- ‘या’ जिल्ह्यातील १६ पोलीस अधिकार्यांच्या तडकाफडकी बदल्या !
- चंद्रकांत पाटील यांनी फक्त सरकार पडण्याची स्वप्न पहावीत; थोरातांचा चंद्रकांत पाटलांना टोला!
- लढा सुरूच : बिहारमध्ये सत्ता महागठबंधनचीच येणार; तेजस्वी यादवांनी व्यक्त केला विश्वास
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

