Share

गंगेत तरंगणारे मृतदेह नायजेरियाचे आहेत : कंगना रनौत

Published On: 

मुंबई : राज्यासह देशभरात गेल्यावर्षी पासून कोरोनाने हाहाकार माजवला आहे. यामुळे अनेकांना आपल्या जवळील व्यक्तींना गमवावं लागलं आहे. कोरोनाच्या थैमानामुळे सर्वत्र चिंताजनक वातावरण निर्माण झालं आहे. देशभरात कोरोनाचा हाहाकार सुरू आहे. त्याबरोबरच अनेक हृदयद्रावक घटना या काळात समोर येत आहे. दरम्यान काही चित्र डोळ्यासमोरुन न हटणारी ठरतात. ते म्हणजे नदीत वाहून येणारे मृतदेह!

वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत राहणारी अभिनेत्री कंगना रनौत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. गंगेत वाहून येत असलेले मृतदेह हे भारतातील नसून ते नायजेरियाचे आहेत लावला आहे. शोध कंगनाने लावला आहे. कंगनाच्या ट्विटर अकाऊंटवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यामुळे कंगना सध्या इंस्टाग्रामवारा सक्रिय आहे. नुकताच कंगनाने एक व्हडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

https://www.instagram.com/tv/CO2ateDB87t/?utm_source=ig_web_copy_link

व्हिडिओमध्ये कंगना म्हणाली, जग अनेक गोष्टींशी सामना करताना दिसत आहे. कोरोना असो की अन्य काही देशांचा संघर्ष सुरू आहे. चांगल्या काळात संयम घालवता कामा नये आणि वाईट काळात हिंमत गमावता कामा नये. आपल्याला यातून काय शिकायला मिळतंय? आता इस्रायलकडेच पाहा. लखोत लोक या देशात आहेत. पण सहा सात देश त्यांच्यावर हल्ला करत आहेत. तरीही हा एकटा देश त्यांच्याविरोधात लढत आहे, असं कंगनाने म्हटलं आहे. त्या देशात असं काय आहे? तुम्ही स्ट्राईक केलीय आम्ही त्याला जुमानत नाही, असं युद्धात उभं राहून कोणी बोलत नाही. अशा प्रकारची घाणेरडी वृत्ती तिथे नाहीये. काही लोक नुसती गंमत बघतात. आनंद लुटतात. आता कोरोना काळात एखादी महिला रस्त्यावर बसून ऑक्सिजन घेत आहे आणि ही बातमी इंटरनॅशनल लेव्हलला व्हायरल होते. आणि मग नंतर माहीत पडतं की हे चित्रं कोरोना काळातील नाही, असं कंगनाने म्हटलं आहे.

आता काल जे फोटो व्हायरल झाले, ते गंगा नदीचे असल्याचं सांगितलं जातं. मात्र, ते फोटो गंगेचे नसून नायजेरियाचे आहेत. अशा फोटोंचा आपण विरोध करायचा नाही का?, असा सवाल यावेळी कंगनाने केला आहे.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!