Share

पश्चिम बंगालमध्ये कोरोनाचा हाहाकार; १५ दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर

Published On: 

कोलकत्ता : देशात दररोज कोरोना रुग्णांची वाढती संख्या भीषण समस्या निर्माण करत आहे. यामध्ये आणखी समस्या निर्माण झाल्या आहेत त्या अपुऱ्या आरोग्य सेवांमुळे २०२० प्रमाणे याही वर्षी देशातकोरोनाने हाहाकार माजवला आहे. किंबहुना मागच्या वर्षीच्या तुलनेत कोरोना हा गंभीररित्या वेगानं देशात पसरत आहे. देशभरात कोरोनाची दुसरी लाट आली असून त्यामुळे अनेकांना प्राणास मुकावे लागत आहे.

मागील काही दिवसांपासून बंगालमध्ये निवडणुकांचे वारे वाहत होते. यामुळे अनेक ठिकाणी गर्दी पाहायला मिळत होती, अनेक राजकीय सभांचे आयोजन करण्यात आलेले होते. निवडणुकांमुळे संसर्गाचा धोका वाढला आहे. याची मद्रास उच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी गंभीर दखल घेऊन थेट निवडणूक आयोगालाच फटकारले होते.

याचे परिणाम आता पश्चिम बंगालमध्ये पाहायला मिळत आहे. पश्चिम बंगालमध्ये कोरोनाचा हाहाकार सध्या पाहायला मिळत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी १५ दिवसांचा कडक लॉकडाऊनची घोषणा केली आहे. याबाबतचे आदेश आता जारी करण्यात आले आहेत. मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय़ घेण्यात आला. यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, आम्ही कोरोनाचा ससंर्ग कमी करण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत. तसंच राज्यात वैद्यकीय सुविधा पुरवण्याचाही प्रयत्न केला. पश्चिम बंगालमध्ये बेड्सची संख्या वाढवून ती 30 हजार इतकी करण्यात आली आहे.

बंगालमध्ये सर्व मेडिकल कॉलेजेसना ऑक्सिजन प्लांट उभारण्यास सांगण्यात आलं आहे. तसंच गरजेनुसार बेड वाढवण्याची सूटही रुग्णालयांना दिली आहे. ममता बॅनर्जी यांनी राज्यात उद्यापासून 15 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. 16 मे ते 30 मे या कालावधीत लॉकडाऊनचे निर्बंध लागू असतील.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!