Share

राहुल गांधी पुन्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदी?

Published On: 

नवी दिल्ली: काँग्रेसला २०१४ मध्ये लागलेली उतरती कळा अजून देखील संपलेली नाही. तर आता पुन्हा एकदा काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडे काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता बळावली आहे. खुद्द राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी पुन्हा स्वीकारण्यास सहमती दर्शवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

राहुल गांधी हे २०१७ मध्ये काँग्रेस अध्यक्ष म्हणून निवडले गेले होते. मात्र २०१९ च्या लोकसभा निवणुकीत काँग्रेस पक्षाच्या दारुण पराभवाची जबाबदारी स्वीकारत राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यांनतर पुन्हा अध्यक्षपदाची सूत्रे सोनिया गांधी यांच्याकडे गेले होते. मात्र ठराविक गट हा राहुल गांधी यांनी पुन्हा अध्यक्षपद स्वीकारावे अशी मागणी गेले वर्षभर करत आहे.

‘महाराजांचा अवमान झाला असता तर मी गप्प बसलो असतो का ? तुम्हाला माझा स्वभाव माहिती आहे’

काँग्रेस कार्यकारिणीची बैठक गेल्या महिन्यात झाली. या बैठकीत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी पुन्हा राहुल गांधींकडे देण्याची मागणी केली. याबाबत अखिल भारतीय काँग्रेस समितीची (एआयसीसी) वर्चुअल बैठक बोलवावी, अशी सूचनाही त्यांनी केली होती.  पुन्हा अध्यक्षपद स्वीकारण्याबाबत राहुल गांधींनी त्यावेळी मौन बाळगले होते. परंतु आधी ज्योतिरादित्य शिंदे यांचे पक्षांतर आणि आता सचिन पायलट यांनी पुकारलेले बंड पाहता राहुल गांधी यांचे मतपरिवर्तन झाल्याचे दिसत आहे.

मुंबई लोकल कधी सुरु होणार? याबाबत राजेश टोपे म्हणाले…

दरम्यान, काँग्रेस वर्किंग कमिटीच्या १५ ऑगस्टनंतर होणाऱ्या बैठकीत राहुल गांधी यांना अध्यक्षपद बहाल केले जाणार असल्याची माहिती काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी दिली आहे. काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी राहुल गांधी यांनी अध्यक्षपद स्वीकारण्याची विनंती केली होती.

नितीन राऊत यांची झाली नाचक्की;वीज कंपन्यांवर केलेल्या अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या रद्द

५० वर्षीय राहुल गांधी सलग चौथ्यांदा लोकसभा खासदारपदी निवडून आले आहेत. उत्तर प्रदेशातील अमेठी मतदारसंघातून २००४ पासून सलग तीन वेळा ते निवडून आले. मात्र २०१९ च्या निवडणुकीत केंद्रीय मंत्री आणि भाजप नेत्या स्मृती इराणी यांच्याकडून राहुल गांधी यांना बालेकिल्ल्यातच पराभवाचा सामना करावा लागला. परंतु केरळमधील वायनाड या मतदारसंघातूनही त्यांनी निवडणूक लढवली होती. या जागेवर ते मोठ्या मताधिक्याने निवडून आले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!