Share

मुंबई लोकल कधी सुरु होणार? याबाबत राजेश टोपे म्हणाले…

Published On: 

मुंबई : देशासह अनेक राज्यातील शहरांमध्ये कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. या पार्श्ववभूमीवर लॉकडाउनमुळे बंद असलेली मुंबईची लोकल कधी सुरु होणार याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. लोकल सुरु करण्याबाबतीत अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच घेतील असं सांगितलं.

बुधवारी (दि. २२) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी ते म्हणाले, “लोकल सेवा सुरु कऱण्याची मागणी रास्त आहे. पण लोकलमध्ये सोशल डिस्टन्सिंगचं पालन शक्य नाही. सध्या हे धोक्याचं ठरु शकतं. लोकल ट्रेन सुरु करण्यासंबंधी अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील”. सोबतच व्यायामशाळा आणि मॉल सुरू करण्याची मागणी मोठय़ा प्रमाणावर होऊ लागली आहे. सर्वबाजूंनी विचार करून त्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचंही यावेळी त्यांनी सांगितलं.

पुढे ते म्हणाले, “शिथिलीकरणाच्या टप्प्यात पुन्हा टाळेबंदी होऊ नये असाच प्रयत्न आहे. जास्तीत जास्त गोष्टी कशा सुरू होतील यासाठी नियम-निकष ठरवण्याचा सरकारचा विचार आहे. आरोग्याशी संबंधित असल्याने व्यायामशाळा सुरू कराव्यात, सर्व अटी पाळून मॉलमधील दुकानांनाही परवानगी द्यावी अशी मागणी होत असून सरकार त्याबाबत गांभीर्याने विचार करत आहे. सर्वबाजूंनी विचार करून त्याबाबत निर्णय होईल. या गोष्टी सुरू करायच्या झाल्यास त्याबाबत नियम-अटी काय असाव्यात हे ठरवले जाईल,” असं राजेश टोपे यांनी सांगितलं.

दरम्यान, लोकलमधून फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच प्रवास करण्याची मुभा असून कामावर जाणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना एसटी बसनेच प्रवास करावा लागत आहेत. बुधवारी नालासोपारा येथे एसटी सेवा बंद असल्याने प्रवाशांचा उद्रेक झाला आणि त्यांनी लोकलने प्रवास करु देण्याची मुभा दिली जावी अशी मागणी केली.

‘मुंबईत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा सुरू करावी’

कोरोनामुळे वाढत चाललेला मृत्यूदर कमी झालाच पाहिजे – राजेश टोपे

देशातील जनतेने शांतता आणि सलोखा राखा : नरेंद्र मोदी

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!