टीम महाराष्ट्र देशा – देशात कोरोनाच संकट वाढत असतानेच आरोग्य व्यवस्थेमधील त्रुटी समोर येऊ लागल्या आहेत. याच बाबत सोशल मिडियामध्ये एक ट्वीट चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यात सरकारी डॉक्टर्सना त्यांच्या सुरक्षेसाठीचे ग्लोज आणि मास्क न मिळाल्याची तक्रार केली जात आहे.
आता कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनीही याबद्दल नापसंती व्यक्त केली आहे रासेच आपल्याकडे पुरेसा अवधी असूनही आपण चांगली तयारी करू शकलो नाही असं आरोप केला आहे. ते आपाल्या ट्वीटरवर लिहतात,
‘मला दुःख होत आहे, कारण हे पूर्णपणे टाळण्यासारखे होत. आपल्याकडे तयारीसाठी वेळ होता. आपण धोका जास्त गंभीरपणे घेऊन चांगली तयारी केली पाहिजे होती. #CoronavirusPandemic
I am feeling sad, because this was completely avoidable. We had time to prepare. We should have taken this threat much more seriously and have been much better prepared. #CoronavirusPandemic https://t.co/dpRTCg8No9
— Rahul Gandhi (@RahulGandhi) March 24, 2020
काल राहुल गांधी यांनी व्हेंटिलेटर्स आणि सर्जिकल मास्क निर्यातीवरही टीका केली होती. ‘करोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने व्हेंटिलेटर्स आणि सर्जिकल मास्कसारखी पुरेसी जीवरक्षक उपकरणं राखून का ठेवली नाहीत? असा सवाल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पतंप्रधान नरेंद्र मोदी यांना केला.
तसेच हा गुन्हेगारी कट तर नाही ना असा संशयही त्यांनी ट्विटच्या माध्यमातून व्यक्त केला आहे. WHO ने सल्ला देऊनही या वस्तूंच्या निर्यातीला परवानगी देणे हा देशवासियांच्या आरोग्याशी खेळ असल्याचा आरोप गांधी यांनी केला आहे.“WHO ने तीन आठवड्यापूर्वीच व्हेंटिलेटर्स आणि सर्जिकल मास्कचा पुरेसा साठा करुन ठेवण्याच्या सूचना केलेल्या असतानाही तीन आठवड्यांनंतर केंद्र सरकारने या उपकरणांच्या निर्यातीवर बंदी घातली. जनतेच्या जीवाशी केलेला हा खेळ कोणत्या ताकदीच्या जोरावर करण्यात आला. हा गुन्हेगारी कट नाही का? असं राहुल गांधी म्हणाले.
दरम्यान, ‘जेव्हा मोदींनी जनता कर्फ्युची घोषणा केली होती, त्यानंतर दुसऱ्याच दिवशी केंद्र सरकारने मास्कच्या निर्यातीवर १९ मार्च रोजी बंदी घातली होती,’ असं राहुल गांधी म्हणाले.
हेही पहा –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

