इस्लामाबाद : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम या दोघांची तुलना अनेकदा केली गेली आहे. भारतीय संघाचा कॅप्टन कोहलीची आकडेवारी बाबर आझमपेक्षा चांगली आहे हे संगळ्यांना माहित आहे. विराट सध्या जगातील सर्वश्रेष्ठ बॅट्समन म्हणून ओळखला जातो.
मात्र, पाकिस्तानचा माजी फास्ट बॉलर अकीब जावेद यानं विराट कोहलीला एक अजब सल्ला दिला आहे. ‘कोहलीनं बाबर आझमकडं पाहून क्रिकेट शिकावं’ असं जावेदनं म्हंटलं आहे. जावेदच्या या विधानानंतर सोशल मीडियावर जोरदार चर्चा देखील चालू आहे. अनेकांनी या विधानावर नाराजी देखील व्यक्त केली आहे. काय म्हणला अकीब जावेद पाहूया.
क्रिकेट पाकिस्तानशी बोलताना जावेद म्हणाला की, ‘विराट कोहलीकडं बाबर आझमच्या तुलनेत शॉट्सची मोठी रेंज आहे. पण एका बाबतीत तो कमकुवत आहे. बॉल स्विंग होत असेल तर जेम्स एंडरसनच्या विरुद्ध तो ऑफ स्टंपच्या बाहेर फसतो. तर बाबर आझमच्या खेळात सचिन तेंडुलकर प्रमाणे कोणतीही कमकुवत बाजू नाही.’
महत्वाच्या बातम्या
- वेंकटेश प्रसादच्या उत्तराने पाकिस्तानी ट्रोलरची बोलती बंद
- डेव्हीड वॉर्नरच्या ‘या’ चुकामुळे झाला हैदराबादचा पराभव
- राज्यात कडक लॉकडाऊन लागणार ? मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची आज महत्वाची बैठक
- आजचा सामना राजस्थानविरुद्ध पंजाब
- पांडेवर भारी नितीशचा डाव ; कोलकाताने हैदराबादला 10 धावांनी केले पराभूत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

