Share

मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर शतकी खेळी करणारा रहाणे आशिया खंडातील चौथा कसोटी कर्णधार

Published On: 

🕒 1 min read

ऑस्ट्रेलिया :  भारतीय संघाचं नेतृत्व करणाऱ्या अजिंक्य रहाणेने ऐतिहासिक बॉक्सिंग डे कसोटीत आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवलं आहे. मेलबर्नच्या मैदानावर पाय रोवून कांगारुंच्या माऱ्याचा सामना करत अजिंक्य रहाणेने शतक झळकावलं.

मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर चालू असलेल्या ‘बॉक्सिंग डे’ कसोटीत अजिंक्य रहाणेने ‘कॅप्टन्स इनिंग’ खेळताना भारतीय संघाला आघाडीच्या दिशेने वाटचाल करून दिली. भारताने दुसऱ्या दिवसाखेर पहिल्या डावात ५ बाद २६६ धावा केल्या आहेत. दरम्यान भारतीय संघाचा प्रभारी कर्णधार रहाणेने शतक ठोकत मानाच्या पंगतीत स्थान मिळवले आहे.

संघाची परिस्थिती लक्षात घेता रहाणेने बचावात्मक फलंदाजी केली आणि पाहता-पाहता नाबाद १०४ धावांपर्यंत मजल मारली. २०० चेंडूत १२ चौकार ठोकत त्याने ही धावसंख्या गाठली. मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर हे रहाणेचे दुसरे शतक आहे. याबरोबरच मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर शतकी खेळी करणारा रहाणे आशिया खंडातील चौथा कसोटी कर्णधार आहे.

आजवर विराट कोहली, एमएस धोनी, कपिल देव, सौरव गांगुली अशा सर्वोत्कृष्ट भारतीय कर्णधारांनाही हा किर्तिमान मिळवता आला नाही. रहाणेव्यतिरिक्त केवळ मास्टर ब्सास्टर सचिन तेंडूलकरने हा पराक्रम केला आहे. १९९९ साली मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर ११६ धावांसह शतकी खेळी करणारा तो पहिला भारतीय कर्णधार ठरला होता.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!