मुंबई : ब्रिस्बेन कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियावर 3 विकेट्सनी दणदणीत विजय मिळवला. या विजयासह भारताने बॉर्डर-गावस्कर मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. 328 धावांचं लक्ष घेऊन मैदानात उतरलेल्या भारताने सात विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. या ऐतिहासिक विजयानंतर टीम इंडिया मायदेशी परतलेली आहे.
भारतात परतल्यानंतर सर्वांचेच उत्साहात स्वागत झाले आहे. दरम्यान ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी मालिकेत प्रभारी कर्णधार म्हणून मोठे यश मिळवलेल्या अजिंक्य रहाणेचे विशेष स्वागत मुंबईत करण्यात आले. सध्या त्याच्या या स्वागताचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहे.
मालिकेत अनेक वेळा अजिंक्यने आपल्या खेळ भावनेने सर्व क्रिकेट रसिकांची मने जिंकली. मग ते सिराजला मैदानातून बाहेर जाताना संघाचे नेतृत्व करण्याची संधी देणे असो , अथवा युवा खेळाडूंना प्रोत्साहन देणे असो. अजिंक्यने प्रत्येक वेळी संघाला एकजूट ठेवले. अशातच भारतात परतल्यावर अजिंक्यने केलेली कृती सर्व भारतीयांना आनंद देऊन गेली. अजिंक्यने मायदेशात परतल्यानंतर झालेल्या स्वागत समारंभादरम्यान कांगारूची प्रतिकृती असलेला केक कापण्यास नकार दिला. अजिंक्यच्या या कृतीचे संपूर्ण भारतवासीयांकडून कौतुक केले जात आहे.
अजिंक्य रहाणेच्या माटुंग्यातील घराजवळ ढोल-ताशांचा गजर करण्यात आला. यावेळी तो राहत असलेली पूर्ण सोसायटी त्याच्या स्वागतासाठी उपस्थित होती. त्यांनी मोठ्या उत्साहाने त्याचे पारंपारिक पद्धतीने स्वागत केले. यावेळी रहाणेला पाहून त्याची दिडवर्षाची मुलगी आर्या देखील त्याला बिलगली होती. तसेच त्याची पत्नी राधिका देखील त्याच्यासोबच होती. रहाणेचे सोसायटीतील काही महिलांनी औक्षणदेखील केले. रहाणेनेही कोणाला नाराज न करता सर्वांनी केलेले स्वागत स्विकारले.
महत्वाच्या बातम्या
- “पंचांनी आम्हाला मैदान सोडण्याचाही पर्याय दिला होता, पण…”, वर्णद्वेषावर सिराजचा खुलासा
- कसोटी संघाचे नेतृत्व रहाणे करणार ?
- ‘उद्या, मला वाटेल मुख्यमंत्री व्हावं कोणी करणार का ?’
- रेणू शर्मांकडून तक्रार मागे; शरद पवार म्हणाले…
- धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा; गंभीर आरोप करणाऱ्या रेणू शर्मांकडून तक्रार मागे


