Share

… तर आज विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला असता !

Published On: 

🕒 1 min read

नागपूर – शेतकरी कर्जमाफी तसेच बोंडअळी, मावा, तुडतुड्याच्या नुकसानभरपाई संदर्भात विरोधी पक्षांच्या प्रस्तावाला मंत्री उत्तर देत असताना शिवसेनेने जाणीवपूर्वक गोंधळ घातला. खरे तर नाणारच्या मुद्यावर मी नियम 57 अन्वये प्रश्नोत्तराचा तास स्थगीत करून चर्चा करण्याबाबत सूचना दिलेली होती. त्यासंदर्भात मंत्र्यांच्या उत्तरानंतर नाणारवर निवेदन करण्यासाठी विधानसभा अध्यक्षांनी मला अनुमतीही दिलेली होती. शिवसेनेला नाणारवर बोलायचेच होते तर माझ्या निवेदनानंतरही त्यांना बोलता आले असते. परंतु, शिवसेनेला केवळ ‘इव्हेंट’च करायचा असल्याने त्यांनी ‘पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन’च्या माध्यमातून गोंधळ सुरू केला. त्यावेळी विरोधी पक्षांनी ठाम भूमिका घेत ‘नाटकबाजी’ करणाऱ्या शिवसेनेला अगोदर संधी न देण्याचा आग्रह अध्यक्षांकडे धरला. अध्यक्षांनी विरोधी पक्षांच्या स्थगन प्रस्तावाअगोदर शिवसेनेला संधी दिली असती तर विरोधी पक्षांवर अन्याय झाल्याच्या निषेधार्थ मी तात्काळ विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला असता, असेही राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

नाणार प्रकल्पावरून राजदंड पळविण्याचा शिवसेनेचा प्रयत्न म्हणजे निव्वळ ‘स्टंट’ होता. या प्रकल्पाला तोंडदेखला विरोध करून शिवसेना कोकणातील जनतेचा विश्वासघात करते आहे. शिवसेनेची भूमिका प्रामाणिक असेल तर त्यांनी आजच्या आज सरकारमधून बाहेर पडून दाखवावे, असे आव्हान विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहे.

शिवसेनेनं शिवबंधन नव्हे भाजपचं मंगळसूत्र बांधावे : विखे-पाटील

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!