🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी अखेर राजीनामा दिला आहे. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी विखे यांच्या राजीनाम्याचा स्वीकार केला आहे. आता कॉंग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर अखेर राधाकृष्ण विखे पाटील भाजपच्या मंचावर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबईमध्ये होणाऱ्या सभेला विखे पाटील हजेरी लावू शकतात.
पुत्र सुजय विखे पाटील यांच्या भाजप पक्ष प्रवेशा नंतर राधाकृष्ण विखे पाटील नेमकी कोणती भूमिका घेणार यावर चर्चा रंगल्या होत्या. पण अखेर या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वीकारला असल्याने आता विखे पाटील पुत्रा प्रमाणे भाजपचा मार्ग धरणार का याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
आज मोदींच्या उपस्थितीत मुंबईत भाजप – सेनेची सभा पार पडत आहे. त्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील हे मोदींच्या सभेला उपस्थित राहणार का याबाबत राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता आहे.
दरम्यान, मोदींच्या उपस्थितीत आज युतीची राज्यातील शेवटच्या टप्यातील सांगता सभा होणार आहे. त्यामुळे भाजप आणि मित्रपक्षांकडून सभा जंगी होण्यासाठी आणि त्यात शक्तिप्रदर्शन करण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीएच्या मैदानात संध्याकाळी ही सभा होणार आहे. सांगता सभा असल्याने या सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह विविध नेते उपस्थित राहणार आहेत.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
