टीम महाराष्ट्र देशा:- विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. सर्वच पक्षाचे नेते प्रचाराला लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर शिर्डी विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमदेवार राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेस पक्ष दुसऱ्याच्या दावणीला बांधला गेला असून, स्वतःची ओळख विसरून बसला असल्याची टीका केली आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या निवडणूक प्रचाराला सुरुवात केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
ते म्हणाले, काँग्रेस स्वतःची ओळख हरवून बसला आहे. ज्यांच्याकडे काँग्रेसने राज्यातील पक्षाची धुरा सोपविली आहे. ते आल्यानंतर सर्वाधिक काँग्रेस नेते पक्ष सोडून गेले आहेत. आता ते तरी पक्षात सुखी राहतील, अशी मला आशा आहे. काँग्रेस दुसऱ्याच्या दावणीला बांधला गेला आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे काँग्रेस पक्षाबद्दल सांगत असले, तरी त्यांच्या सातारा जिल्ह्यात काँग्रेसची अवस्था काय आहे, हे त्यांनी बघितले पाहिजे. या अधोगतीला जबाबदार कोण आहे, याचा विचार त्यांनी केला पाहिजे, असे विखे पाटील यांनी सांगितले.
दरम्यान राधाकृष्ण विखे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. भाजप सरकारच्या काळात त्यांच्याकडे विधानसभेतील विरोधी पक्ष नेतेपदाची जबाबदारी होती.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1181852684791402496?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1181856719606992897?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

