🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : कॉंग्रेसला अलविदा म्हणत भाजप मध्ये दाखल झालेले राधाकृष्ण विखे पाटील यांची उद्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात वर्णी लागली आहे. तर विखे पाटील हे भाजप – सेना सरकारमध्ये येऊन कृषी खात्याची जबाबदारी सांभाळणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
अखेर बहूप्रतिक्षीत राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या रविवार १६ जून रोजी होणार हे नक्की झाले असून, सकाळी ११ वाजता नवे मंत्री शपथ घेणार आहेत. अशी माहिती खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तर संभाव्य मंत्र्यांना आज संध्याकाळपर्यंत ‘वर्षा’ बंगल्यावर पोहचण्याचा निरोप देण्यात आला आहे. हा निरोप राधाकृष्ण विखे पाटील यांना देखील पोहचला आहे. त्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील हे मुंबईकडे रवाना झाले आहेत.
सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार, राधाकृष्ण विखे-पाटील यांना थेट कृषी मंत्रिपद दिलं जाणार आहे. आतापर्यंत मंत्रिमंडळ विस्तारात कुणाला मंत्रिपद मिळेल याचीच चर्चा सुरू होती. पण आता पहिल्यांदाच मंत्र्याच्या खात्याबाबतही माहिती समोर येत आहे. दरम्यान, उद्याच्या शपथविधी सोहळ्यानंतरच खातेवाटप होणार आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

