Share

मुंबई विमानतळावर शिवसैनिकांचा राडा ; ‘अदानी एअरपोर्ट’ बोर्डची केली तोडफोड

Published On: 

मुंबई : मुंबई विमानतळाच्या नावावरून सध्या महाराष्ट्रात नवा वादंग निर्माण झाला आहे. विमानतळाच्या व्यवस्थापनाचा ताबा अदानी यांच्या कंपनीकडे गेल्यामुळे त्याठिकाणी अदानी एअरपोर्ट्स असे नावाचे बोर्ड लावण्यात आले होते. हे सर्व बोर्ड्स आज शिवसैनिक आणि भारतीय कामगार सेनेच्या कार्यकर्त्यांनी फोडले.

अदानी उद्योग समूहाने मुंबई विमानतळाला ‘अदानी एअरपोर्ट्स’ असं नाव लावलं होतं. या संदर्भात अनेक तक्रारी शिवसैनिकांकडे आल्या. त्यानंतर संतप्त शिवसैनिकांनी आणि भारतीय कामगार सेनेने विमानतळाला लावलेले अदानी एअरपोर्ट्सचे नाव फोडून टाकले. मुंबईचे विमानतळ जीव्हीके समूहाकडे होते. परंतु, जीव्हीके समूह आर्थिक संकटात आल्याने हे विमानतळ अदानी समूहाने खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू केली होती.

त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ पूर्णपणे अदानी समूहाच्या ताब्यात गेले आहे. मुंबई विमानतळाचा ताबा मिळताच विमानतळावर व बाहेर अदानी विमानतळ असे नामफलक लावण्यात आले आहेत. त्यामुळे संतप्त शिवसैनिकांनी आज व्हीआयपी गेट नंबर 8 आणि विलेपार्ले हायवेवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोरील बोर्ड लाठ्यांनी तोडला. मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात आले आहे. मात्र तिथे अदानी विमानतळ असे लावलेले बोर्ड अजिबात सहन केले जाणार नाहीत, असं शिवसैनिकांचं मत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!