Share

जातिवाचक शिवीगाळ; आरोपी छिंदमचा अटकपूर्व जामीन खंडपीठाने फेटाळला

Published On: 

औरंगाबाद : जातिवाचक शिवीगाळ व मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या छिंदम बंधूंचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळला. दिल्ली गेट येथील ज्यूस सेंटरमधील साहित्य फेकून देत तिघांना जातिवाचक शिवीगाळ व मारहाणप्रकरणी श्रीपाद व श्रीकांत छिंदम भावांसह ३० ते ४० जणांविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी छिंदम भावांसह चौघांनी उच्च न्यायालयाकडे अटकपूर्व जामीन अर्ज सादर केला होता.

भगीरथ भानुदास बोडखे यांच्या ज्यूस सेंटरमधील साहित्य क्रेनच्या मदतीने फेकून देणे, तसेच बोडखे यांच्यासह त्यांची पत्नी व मुलाला जातिवाचक शिवीगाळ करत मारहाण केली होती. याप्रकरणी अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी छिंदम बंधू व अन्य दोघांनी जिल्हा व सत्र न्यायालयाकडे अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र जिल्हा व सत्र न्यायालयाने हा अर्ज फेटाळला. त्यानंतर या आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, खंडपीठाने तो फेटाळला.

काय आहे प्रकरण?
साधारण दोन महिन्यांपूर्वी भागीरथ भानुदास बोडखे (५२, रा. वारुळाचा मारुती, नालेगाव) हे दिल्ली गेट येथील एका गाळ्यात काम करत होते. यावेळी छिंदम बंधू व अन्य ३० ते ४० लोक त्या ठिकाणी आले. बोडखे यांना ही जागा आम्ही विकत घेतली आहे आत्ताच्या आता चालता हो, तुझे सामान बाहेर काढ, अन्यथा तुला पाहून घेऊ, असे म्हणत दमबाजी केली. यावेळी बोडखे यांना शिवीगाळ करून जातीवाचक शब्द वापरले.

बोडखे यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, संबंधित आरोपी दमदाटी व शिवीगाळ करत असताना फिर्यादीने मुलगा व अन्य घरच्या लोकांना बोलावून घेतले. त्यांनादेखील संबंधित आरोपींनी शिवीगाळ करत दमदाटी करण्यात आली. फिर्यादी बोडखे यांची पत्र्याची टपरी क्रेनने उचलून त्याजागी नवीन टपरी ठेवण्यात आली. याप्रकरणी बोडखे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तोफखाना पोलिसांनी श्रीकांत शंकर छिंदम, श्रीपाद शंकर छिंदम, महेश सब्बन, राजेंद्र जमदाडे आणि राजेंद्र म्याना छिंदम यांच्यासह अन्य ४० लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, अहमदनगरचा तत्कालीन उपमहापौर असलेल्या श्रीपाद छिंदम याने महापालिका कर्मचाऱ्याशी दूरध्वनीवरुन बोलताना शिवरायांबाबत अवमानजनक अपशब्द वापरले होते. तीन वर्षांपूर्वी घडलेल्या या घटनेचे राज्यभर तीव्र पडसाद उमटले होते. विशेष म्हणजे त्यानंतर श्रीपाद छिंदम अहमदनगर महापालिकेच्या निवडणुकीला पुन्हा उभा राहिला होता. अपक्ष उभ्या राहिलेल्या छिंदमचा निवडणुकीत त्याचा विजयही झाला. तर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत बसपाच्या तिकीटावर रिंगणात उतरण्याची हिंमतही केली होती. परंतु सुज्ञ नागरिकांनी त्याला नाकारले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!