टीम महाराष्ट्र देशा :मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यातील सर्वसाधारण 8 लाख 5 हजार हेक्टरच्या तुलनेत 2 लाख 44 हजार 167 हेक्टरवर रब्बीची पेरणी झाली आहे. अजूनही बहूतांश भागात वापसा स्थिती नसल्याने रब्बी पेरणीसाठी शेती तयार करतांना शेतकऱ्यांची दमछाक होते आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात सर्वसाधारण 2 लाख 8 हजार 188 हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत रब्बीची केवळ 29900 हेक्टरवर रब्बीची पेरणी झाली. जालना जिल्ह्यात सर्वसाधारण 1 लाख 74 हजार हेक्टरच्या तुलनेत 69 हजार 684 हेक्टरवर तर बीड जिल्ह्यात सर्वसाधारण 4 लाख 22 हजार 730 हेक्टरच्या तुलनेत 1 लाख 44 हजार 583 हेक्टरवर रब्बीची पेरणी झाल्याची माहिती कृषी विभागाच्या सुत्रांनी दिली. शेती तयार करण्यात येणाऱ्या अडचणी, बहूतांश पिकांसाठी पेरणीसाठीचा निश्चीत कालावधी निघून गेल्याने अपेक्षीत क्षेत्रावर पेरणी होईल की नाही हा प्रश्न आहे.
प्रमुख पिकाचे क्षेत्र
पिक…………….क्षेत्र(हेक्टरमध्ये)
रब्बी ज्वारी….1 लाख 62 हजार 532
गहू……………16668.50
मका…………..5485
इतर तृणधान्य….14844
हरभरा…………59098
करडई…………246
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1199651848405209088?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1199651512835657729?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

