बीड: जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेवर रेमडिसीवीरसह ऑक्सिजनसाठी रांगा लावण्याची वेळ आली आहे. कोरोना बाधितांच्या आकडा वाढत चालल्यान ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा निर्माण होत असून रात्री एसआरटीमध्ये ऑक्सिजन कमी पडणार हे लक्षात आल्यानंतर तेथील प्रशासनासह विधान परिषदेचे आमदार संजय दौंड यांनी ऑक्सिजनची व्यवस्था केली. मात्र ऑक्सिजनची व्यवस्था करण्यात बरीच धावपळ करावी लागली.
अंबाजोगाईच्या एसआरटी सेंटरमध्ये रात्री वेळेत ऑक्सिजनचा पुरवठा झाला नाही त्यामुळे पाच-सात तास पुरेल एवढेच ऑक्सिजन उपलब्ध होते. २२५ पेक्षा जास्त रुग्ण ऑक्सिजनवर असल्यामुळे एसआरटी प्रशासनाची झोप उडाली. ऑक्सिजन आणायचे कुठून? असा प्रश्न सर्वांना पडला. सध्या राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये अपुऱ्या वैद्यकीय सुविधांमुळे रुग्णांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
रुग्णलायाचे अधिष्ठाता शिवाजी सुकरे यांनी ऑक्सिजनसाठी प्रयत्न केले. आमदर संजय दौंड यांनी लातूरच्या संबंधित एजन्सीसोबत संपर्क केला. अधिकार्यांसह लोकप्रतिनिधींनी जागून एसआरटीला ऑक्सिजन उपलब्ध करून दिले. सर्वत्र वैद्यकीय सुविधांचा तुटवडा जाणवत असल्याने प्रशासन तसेच रुग्णांचे देखील हाल होत आहेत. त्यामुळे सरकारने तत्त्काळ सुविधा उपलब्ध कराव्यात अशी मागणी करण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या
- निर्णय झाला, आदेश आलेच नाहीत औरंगाबादेत दुपारी १ वाजेपर्यंत दुकाने सुरूच!
- खासगी रुग्णालयात कोरोना रुग्णांच्या बिलाचे आता दररोज ऑडीट :विभागीय आयुक्तांच्या सूचना
- ‘कोरोना काळात जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी जराही खपवून घेतली जाणार नाही’
- राज्यात १५ दिवसाचा कडक लॉकडाऊन लागण्याची शक्यता ; कॅबिनेटमध्ये होणार निर्णय?
- दिलदार शेतकरी ! कोविड सेंटरसाठी शासनाला विनामोबदला शेती द्यायला तयार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

