औरंगाबाद : मराठवाड्यातील कोरोना रुग्ण संख्या वाढत असतांना अनेक रुग्णांना व्हेंटिलेटरची गरज पडत आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या वतीने आरोग्य सुविधा पुवण्यात येत आहे. त्यातच केंद्र सरकारच्या ‘पीएम केअर’च्या माध्यमातून मराठवाड्याला १५० व्हेंटिलेटर मिळाले आहेत. मात्र, यातील अनेक व्हेंटिलेटर खराब असल्याचा आरोप खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे.
या संदर्भात खासदार जलील यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केलीय. ते म्हणाले की, ‘पीएम-केअरच्या माध्यमातून मराठवाड्याला १५० व्हेंटिलेटर मिळाले आहेत मात्र, त्यातील बरेचशे खराब आहेत. ज्या हॉस्पिटलला ते मिळाले त्यांच्या सांगण्यानुसार हे व्हेंटिलेटर अत्यंत सुमार दर्जाचे असून कोरोना रुग्णांसाठी ते उपयोगी पडतील अशी शक्यता कमीच आहे. यामध्ये मोठा घोटाळा असण्याची शक्यता आहे. मात्र, पंतप्रधानांडून आलेले व्हेंटिलेटर असल्याने मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार.’
Marathwada received 150 ventilators from PM-Care but most are defunct.Hospitals where they have been given have reported that they are of sub standard quality and hardly could be used for Covid.Major scam expected but who will bell the cat since it has come from PM! @asadowaisi
— Imtiaz Jaleel (@imtiaz_jaleel) May 10, 2021
मराठवाड्यातील रुग्णांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी खासदार जलील अनेक पातळीवर प्रयत्न करत आहेत. त्यात त्यांनी आरोग्य कर्मचारी भरतीसाठी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका देखील दाखल केली होती. आता या व्हेंटिलेटरच्या संदर्भातही त्यांनी आवाज उठवला आहे. यामध्ये घोटाळा झाला असेल तर त्याची चौकशी व्हायलाच हवी.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘संभाजीराव काकडे यांच्या निधनामुळे पुणे जिल्ह्यानं ज्येष्ठ, मार्गदर्शक नेतृत्वं गमावलं’
- ‘सोलापूरकरांवर अन्याय झाला तर राजकारणातून संन्याय घेईल, आमदारकीचाही राजीनामा देईल’
- मराठा समाजाला आरक्षण मिळू नये याची काँग्रेस-राष्ट्रवादीने पायाभरणी केली – घाटगे
- ‘माझ्याकडे नवरा आहे…’; ट्विंकलने युजरला दिले गमतीशीर उत्तर
- कोरोनाच्या खळबळजनक बातम्यांवर बंदी घालण्याची याचिका औरंगाबाद खंडपीठाने फेटाळली


