सोलापूर : मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकरीत आरक्षण देणारा राज्य सरकारचा कायदा सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरवला. शिवाय आरक्षणाचा कायदा करण्याचा अधिकार राज्य सरकारांना नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. न्यायालयाचा या निकालानंतर मराठा समाज हा तीव्र नाराज झाला असून राज्यभरात विविध आंदोलने आणि मोर्चे काढले जात आहेत.
दरम्यान, कोरोना काळात मराठा समाजाने संयम बाळगण्याचं आवाहन राज्य सरकारतर्फे केलं जात असलं तरी विविध मराठा संघटना, पक्ष हे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक झाले आहेत. काल सोलापुरातील आक्रोश आंदोलनात देखील पोलिस आणि नेत्यांमध्ये काहीसा संघर्ष पाहायला मिळाला. यावेळी मराठा क्रांती मोर्चादरम्यान जिल्ह्यातील अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. ‘आंदोलन दडपण्याचा प्रकार तत्काळ थांबवा तसेच जी कारवाई करायची आहे ती माझ्यावर करा, भलेही मला 15 दिवस जेलमध्ये घाला मात्र माझ्या समाजातील कार्यकर्त्यांना सोडा, अशी विनंती मराठा क्रांती मोर्चाचे प्रमुख नरेंद्र पाटील यांनी जिल्हाधिकार्यांना केली आहे.
सोलापुरातील मोर्चाला मराठा समाजातील अनेक नेतेमंडळी मोठ्या संख्येेने उपस्थित होती. काहींना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. काहींची कोरोना चाचणी करण्याचा प्रकार करण्यात आला आहे. हा प्रकार म्हणजे शासनानेच पोलिसांच्या माध्यमातून आंदोलन दडपण्याचा प्रकार आहे. त्यामुळे याचा उद्रेक होऊ शकतो. त्यामुळे जी कारवाई करायची ती माझ्यावर करा मात्र समाजातील युवकांना तत्काळ सोडा, अशी विनंती पाटील यांनी केली.
महत्त्वाच्या बातम्या
- समाजासाठी गट-तट न पाडता एकत्र येत लढा उभारावा, मराठा क्रांती मोर्चाच्या मंथन परिषदेत आवाहन!
- ‘भास्कर टपोऱ्या सारखा कोणाचीही कळ काढतो म्हणून शिव्या दिल्या असतील, सवय आहे त्याला’
- ‘अध्यक्षांच्या चेंबरमध्ये शिवीगाळ कोणी केली हे जाणून घेण्यासाठी भास्कर जाधव यांची नार्को टेस्ट करा’
- उत्पादन खर्च शून्य म्हणूनच ‘झिरो बजेट’ शेती आधुनिक तंत्र!
- ‘१२ आमदारांचे निलंबन म्हणजे नियोजन पद्धतीने लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

