Share

मोदी सरकारला धक्का; NDA तून आणखी एक मित्रपक्ष बाहेर

Published On: 

नवी दिल्ली:- गेल्या काही दिवसांपासून दिल्ली सीमेवर कडाक्याच्या थंडीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारने लादलेले जाचक तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी नेते ठाम आहेत. देशभरातून शेतकऱ्यांना समर्थन वाढत आहे. अशात हे कायदे शेतकरी हिताचे असल्याचे सांगणाऱ्यांची देखील संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.

मोदी सरकारने कृषी कायदे आणल्यामुळे नुकतंच पंजाबमधील शिरोमणी अकाली दलाने भाजपची साथ सोडली. या कायद्यांना कडाडून विरोध करत, प्रकाशसिंह बादल यांनी शेतकऱ्यांच्या बाजूची भूमिका घेतली. त्यानंतर आता राजस्थानातील भाजपचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाने भाजपची साथ सोडली आहे.

राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाचे नेते हनुमान बेनीवाल यांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत NDA मधून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला आहे. बेनीवाल म्हणाले, शिवसेना आणि अकाली दलाने आधीच भाजपची साथ सोडली आहे, आता RLP ही भाजपपासून वेगळं होत आहे. नरेंद्र मोदींकडे 303 खासदारांचं बळ आहे. त्यामुळेच ते कृषी कायदे मागे घेत नाहीत. 1200 किमी दूर असलेल्या राजस्थानातून शेतकरी दिल्लीकडे कूच करत आहेत. त्यामुळे मी एनडीए सोडत असल्याची घोषणा करतो, असे बेनीवाल म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!