पुणे : कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत अधिक रुग्ण नोंदवले जात आहेत. दरम्यान, पुणे शहरात एप्रिल महिन्यात दररोज पाच ते सात हजार रुग्णांची वाढ होत होती. यामुळे पुणे शहरासह जिल्ह्यासाठी देखील ही बाब गंभीर होती. यानंतर कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने घसरल्यामुळे काहीसा दिलासा मिळाला.
१४ जूनपासून शहरात निर्बंध अधिक शिथिल झाले असून पुणे आता पूर्वपदावर येत आहे. अशातच कोरोनाचा धोका हा पूर्णपणे टळला नसून योग्य खबरदारी घेणं आवश्यक आहे. यामुळे वीकेंड म्हणजेच शनिवार आणि रविवारी पुणे शहरात निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये रुग्णसंख्येत किंचित वाढ होत असल्याचं दिसून येत होतं.
मात्र, आता पुणेकरांसाठी दिलासादायक माहिती समोर येत आहे. आज (दि. २१ जून) रोजी पुण्यात दुसऱ्या लाटेतील नीचांकी रुग्णसंख्या नोंदवण्यात आली आहे. आज पुणे शहरात १३६ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.
शहरातील २२३ कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या ४ लाख ६४ हजार ९८३ झाली आहे. दरम्यान, पुणे शहरात उपचार घेणाऱ्या (ऍक्टिव्ह रुग्ण) २ हजार ४७० रुग्णांपैकी ३५९ रुग्ण गंभीर तर ५०३ रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. नव्याने ६ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ऑईल सील, हेडलाईट स्वीचसह कारच्या बनावट साहित्यांची विक्री, दोन दुकानांवर कारवाई
- ‘आमच्याकडे अजून तो आजार आलेला नाही, शिवसेनेत फक्त बाळासाहेब ठाकरे हा एकमेव गट’
- ‘सरकार जनहिताची कामे करतंय; भाजपची भविष्यवाणी खरी ठरत नाही’
- मराठा आंदोलनासाठीचे मूकमोर्चे एका महिन्यासाठी स्थगित ; संभाजीराजेंची घोषणा
- …अन् विराट कोहली मैदानात करू लागला भांगडा , पाहा भन्नाट व्हिडीओ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
