🕒 1 min read
पुणे : 31 डिसेंबर म्हणजेच 2021 ला बाय बाय करण्यासाठी आणि नविन वर्षाच्या स्वागतासाठी सर्व नागरिक सज्ज झाले आहेत. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. वाहतूक पोलिसांनी जंगली महाराज रोड, फर्ग्युसन रोड, महात्मा गांधी रस्त्यावर 31 डिसेंबरला सायंकाळी 7 ते पहाटे 5 वाजेपर्यंत ‘नो व्हेईकल झोन’ करण्यात आला आहे.
शहरातील डेक्कन भागातील गुडलक चौक ते फर्ग्युसन कॉलेजचे मुख्य गेट, झाशी राणी चौक ते खंडोजीबाबा चौक, हॉटेल अरोरा टॉवर चौक ते ट्रायलक हॉटेल चौक (पुलगेट चौकी) दरम्यान वाहनांना प्रवेशास बंदी घालण्यात आली आहे. या रस्त्यावरील वाहतूक अन्य रस्त्यांवर वळविण्यात येईल.
पुणे कॅम्प भागात आज 31 डिसेंबरला सायंकाळी 7 वाजल्यापासून ते गर्दी संपेपर्यंत करण्यात येणारे वाहतूक वळवण्यात आली आहे. यावेळी वाहतूक वाय जंक्शनवरून एमजी रोडकडे येणारी वाहतूक ही 15 ऑगस्ट चौक येथे बंद करून ती कुरेशी मशिद आणि सुजाता मस्तानी चौकाकडे वळविण्यात आली आहे. इस्कॉन मंदिर चौकाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, अरोरा टॉवरकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. अशा प्रकारे वाहतूकीच्या नियमांमध्ये बदल केले असून नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज असलेल्या नागरिकांच्या आनंदावर निर्बंधांचे विरझन आल्याचे दिसत आहे.
दरम्यान, कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आणि नववर्षाला होणारा जल्लोश या सर्व बाबींता विचार करता शासनाने राज्यात निर्बंध लादले आहेत. मात्र नागरिकांनी निर्बंधांचे पालन न केल्यास लॉकडाऊन करणार असल्याचेही प्रशासनाकडून इशारा देण्यात आला आहे. राज्य सध्या लॉक डाऊनच्या उंबरठ्यावर असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- जिल्हा बँकेचा निकाल लागताच राणे समर्थकांनी पुन्हा म्याव म्याव करत सेनेला डिवचलं
- जिल्हा बँक निवडणुकीच्या विजयानंतर गायब असलेल्या नितेश राणेची पोस्ट
- सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर भाजपने निर्विवाद विजय मिळवला-चंद्रकांत पाटील
- सिंधदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत भाजपला मिळालेल्या विजयावर वडेट्टीवारांची प्रतिक्रिया
- ‘वस्तू व सेवाकर परिषद’ बैठकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांचे केंद्रीय अर्थमंत्र्यांना पत्र
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

